शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बडे काम की चीज! LIC ने आणली नवी पॉलिसी; आयुष्यभर देणार उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 17:27 IST

LIC launches Jeevan Akshay-VII annuity plan कोणत्याही  अ‍ॅन्युईटी स्कीममध्ये एकरकमी गुंतवणूक केल्यास त्यानंतर एक निश्चित उत्पन्न मिळत राहते. ही कमाई आयुष्यभर होत राहते.

देशाची सर्वात मोठी आणि सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने एक खास पॉलिसी लाँच केली आहे. या पॉलिसीचे नाव जीवन अक्षय-7 (प्लॅन नंबर 857) आहे. या प्लॅननुसार तुम्ही गुंतवणूक केल्यावर आयुष्यभर कमाई करू शकणार आहात. चला जाणून घेऊयात या पॉलिसीबाबत. 

एलआयसीची जीवन अक्षय-7 (Jeevan Akshay- VII) ही एकरकमी नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल अ‍ॅन्युईटी स्कीम आहे. तुमच्या माहितीसाठी कोणत्याही  अ‍ॅन्युईटी स्कीममध्ये एकरकमी गुंतवणूक केल्यास त्यानंतर एक निश्चित उत्पन्न मिळत राहते. ही कमाई आयुष्यभर होत राहते. या पॉलिसीमध्ये वार्षिक, तिमाही आणि मासिक हप्ता देण्याचे प्रकार उपलब्ध आहेत. कमीतकमी अ‍ॅन्युईटी ही वर्षाला 12000 रुपयांपासून सुरु होते. पॉलिसी सुरु होताच अ‍ॅन्युईटी दरांची गॅरंटी दिली जाते. या पॉलिसीला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारांत खरेदी करता येणार आहे. या प्लॅनचे कमीतकमी खरेदी मूल्य एक लाख रुपये आहे. येथे अधिकाधिक खरेदी मूल्याची कोणतीही मर्यादा नाहीय. 

हा प्लॅन 30 वर्ष ते 85 वर्षे वयाच्या लोकांसाठी उपलब्ध आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी देखील ही योजना घेता येणार आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेत एकाच कुटंबातील दोन वंशज (आजोबा-आजी, आई-वडील, मुले, नातू-नात) पती-पत्नी किंवा भावा बहिणीमध्ये जॉईंट लाईफ अ‍ॅन्युईटी घेतली जाऊ शकते. पॉलिसी जारी केल्यानंतर तीन महिन्यांनी त्यावर कर्जाची सुविधाही मिळणार आहे. याचा अर्थ पॉलिसी धारक कर्जदेखील घेऊ शकणार आहे. ही पॉलिसी 25 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

शेवटी आयआयटीच ती! कारसाठी बनविली जबरदस्त बॅटरी; एका चार्जिंगमध्ये 1600 किमीची रेंज

CoronaVirus News चीनला भिडला! छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य

एकटीला पाहून साधुने बलात्काराचा प्रयत्न केला; मार्शल आर्ट मास्टर महिलेने धु धु धुतले

सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण; झाले क्वारंटाईन

किम जोंग उन जिवंत! बोलावली आपत्कालीन बैठक; उत्तर कोरियाकडून पुन्हा फोटोद्वारे 'दर्शन'

CoronaVirus News लस टोचल्यानंतरही कोरोनाची लागण होणार? तेलंगानातील रिपोर्ट चिंता वाढविणारा

CoronaVirus News: गंभीर इशारा! थंडीत लस अशक्य; पण कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता

कौन बनेगा? तुम्ही देखील बनू शकता करोडपती; रोज फक्त 30 रुपये बाजुला काढा

टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीPensionनिवृत्ती वेतन