ग्रंथपाल वेतनश्रेणीसाठी तावडे यांना साकडे
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:17+5:302015-02-18T00:13:17+5:30
नाशिक : माध्यमिक विद्यालयातील ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी नाशिक जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले.

ग्रंथपाल वेतनश्रेणीसाठी तावडे यांना साकडे
न शिक : माध्यमिक विद्यालयातील ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी नाशिक जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले. माध्यमिक शाळांमधील पदवीधर ग्रंथपालांना सुधारित वेतनश्रेणी (बीएड समकक्ष) लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. शिक्षण विभाग वेतनश्रेणी देण्यास टाळाटाळ करीत असल्याने मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात सुमारे ७० अवमान याचिका दाखल झाल्या आहेत. तरीही राज्यशासन दखल घेत नसून पदवीधर ऐवजी पदविकाधारकांची वेतनश्रेणी देऊ पाहत आहे, तसे केले तरी हा उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. त्यामुळे शासनाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी मागणी करणारे निवेदन तावडे यांना शासकीय विश्रामगृहावर देण्यात आले. शासन न्यायालयाचा अनादर करणार नाही, असे आश्वासन तावडे यांनी यावेळी दिले. आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली सदरचे निवेदन संघटनेचे ग्रंथपाल विभागप्रमुख विलास सोनार यांनी दिले.