हेलिकॉप्टरच्या परवानगीसाठी जिल्हाधिकार्यांना पत्र
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
कम्प्यूटर बाबा : शाहीस्नानासाठी साधूग्राम ते रामघाटपर्यंत हेलिकॅप्टरने जाण्याची तयारी
हेलिकॉप्टरच्या परवानगीसाठी जिल्हाधिकार्यांना पत्र
कम्प्यूटर बाबा : शाहीस्नानासाठी साधूग्राम ते रामघाटपर्यंत हेलिकॅप्टरने जाण्याची तयारीपंचवटी : सिंहस्थ कुंभमेळयाच्या शाहीस्नानासाठी आलेले विविध आखाडयाच्या साधूमहंतांपैकी कोणी घोडयावर कोणी बग्गीवर तर कोणी फुलांनी सजविलेल्या चारचाकी वाहनातून जाणार आहेत. मात्र मध्यप्रदेशच्या षटदर्शन साधू मंडलच्या अनंत विभूषित श्री श्री १००८ महामण्डलेश्वर कम्प्यूटर बाबा (नामदेवदास त्यागी) यांनी साधूग्राम ते रामघाट असा प्रवास हेलिकॅप्टरने करता यावा यासाठी जिल्हाधिकार्यांना पत्र देऊन परवानगी मागितली आहे. हेलिकॅप्टने साधूग्राम ते रामघाटपर्यंत जाता यावे यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी तसेच हेलिकॅप्टर उतरविण्यासाठी व उडविण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी करून प्रशासनाला बुचकाळयात पाडण्याचा प्रयत्न केला आहे. दोन दिवसांपासून प्रशासनाला हेलिकॅप्टरने रामघाटापर्यंत जाण्यासाठी पत्रव्यवहार केला असला तरी त्यावर प्रशासन मौन बाळगून असल्याने प्रशासन परवानगी देणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही. मात्र प्रशासनाने स्थानिक पातळीवर परवानगी न दिल्यास आपण राज्य शासनाकडून परवानगीसाठी घेऊन आणि तेथूनही परवानगी न मिळाल्यास थेट केंद्र शासनाची परवानगी आणू असा दावा केला आहे. परवानगी मिळाली तर ठिक नाही तर वेळप्रसंगी हवेतच तीन तास हेलिकॅप्टर उडवू असेही सांगितले आहे. (वार्ताहर)