शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आधी पक्ष बळकट करू, नंतर महायुती! महाराष्ट्रासाठी भाजपकडून तयारी सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 06:33 IST

महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका घेणार आहेत.

संजय शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांची एक फेरी पुढील आठवड्यात मुंबईत होणार आहे. महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका घेणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पूर्ण ताकद लावण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हेही मुंबईतील भाजप नेत्यांशी निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करणार आहेत.

निवडणूक सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, अगोदर पक्ष बळकट करण्यावर भर दिला जाईल. जे नाराज आहेत त्यांना समजवून कामाला लावू, झालेल्या चुका सुधारू आणि मग महायुती मजबूत करू. भाजपकडून कमकुवत क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

नाराजांना भेटणार‘भाजप’चे जुने नेते आणि नाराज नेते यांच्या घरी जाऊन भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांना भेटतील आणि त्यांची नाराजी दूर करतील. २०१९ मध्ये भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ९ जागाच जिंकता आल्या आहेत.

‘लाडली बहना’ आता महाराष्ट्रातमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘लाडली बहना’ योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एक कोटी महिलांच्या बँक खात्यात दरमहा १२०० ते १५०० रुपये जमा केले जाणार आहेत.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र