शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया; पीयूष गोयल यांनी केले आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली ५० वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. त्यांचे कार्य हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०४७ सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्धार केला आहे. त्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी देशातील सर्व नागरिकांनी एकजुटीने काम करणे व आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली ५० वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. त्यांचे कार्य हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी सांगितले.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणाऱ्या नेमबाज मनु भाकर, महिला सक्षमीकरणाचे प्रतीक असलेल्या रुमा देवी व बुद्धिबळातील युवा ग्रँडमास्टर दिव्या देशमुख या तीन ख्यातनाम व्यक्तींना डायनामाईट न्यूजच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त यंदाच्या वर्षासाठीचे यंग इंडिया कंट्री अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोयल तर मुख्य वक्ते म्हणून माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश बिंदल, भाजपचे माजी राज्यसभा खासदार डॉ. अनिल अग्रवाल, डायनामाईट न्यूजचे संस्थापक व मुख्य संपादक मनोज टिबरेवाल आकाश, चॅनेलच्या अध्यक्ष राणी टिबरेवाल आदी मान्यवरही उपस्थित होते.

पुरस्कार विजेत्या महिला सबलीकरणाच्या प्रतीक: माजी सरन्यायाधीश 

माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, ‘यंग इंडिया कंट्री अवॉर्ड’साठी प्रतिभावंत महिलांची निवड करण्यात आली आहे. त्या एकप्रकारे महिला सबलीकरणाच्या प्रतीक आहेत. भारताची आजची स्थिती लक्षात घेतली, तर एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ४५ कोटी लोक १८ वर्षे वयापेक्षा कमी वयाचे आहेत. देशातील ८५ टक्के लोकसंख्या ४९ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. सुमारे २५ कोटी मुले १० वर्षे वयाखालील आहे. अशा भारताला प्रगतीसाठी अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Strive unitedly to make India a developed nation by 2047.

Web Summary : Piyush Goyal urged citizens to work together to achieve PM Modi's vision of a developed India by 2047. Awards were presented to Manu Bhaker, Ruma Devi, and Divya Deshmukh at the Dynamite News anniversary event, celebrating women's empowerment and youth achievement.
टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलBJPभाजपाDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड