शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्या: काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 7:19 AM

मोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्यावी, असे साकडे काँग्रेस पक्षाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना घातले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पदाचा दुरुपयोग करून राजकीय आणि व्यक्तिगत हिशेब चुकते करण्यासाठी विरोधीपक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना संपविण्याची वक्तव्ये जाहीरपणे करीत आहेत, अशी तक्रार करत मोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्यावी, असे साकडे काँग्रेस पक्षाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना घातले आहे.कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी पंतप्रधानपदाला न शोभणारी भाषा वापरल्याचे राष्ट्रपतींना रविवारी पाठविलेले पत्र काँग्रेसने सोमवारी प्रसिद्ध केले. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे व आत्तापर्यंत त्याने अनेक आव्हाने व धमक्या पचविल्या आहेत. अशा धमक्यांना काँग्रेसचे नेतृत्व नेहमीच धीराने व निर्भयतेने सामोरे गेले आहे. त्यामुळे मोदींच्या धमक्यांपुढेही काँग्रेस पक्ष किंवा त्याचे नेते जराही नमणार नाही, असे या पत्रात ठामपणे नमूद करण्यात आले आहे.मोदी यांनी काँग्रेस नेतृत्वास दिलेली धमकी सर्वस्वी निषेधार्ह आहे. १३० कोटी लोकांच्या व राज्यघटनेनुसार शासन चालणाऱ्या भारतासारख्या (पान ५ वर)(पान १ वरून) लोकशाही देशाच्या पंतप्रधानाच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने जाहीरपणे किंवा खासगीतही अशी वक्तव्ये करणे हे पूर्णपणे अस्वीकारार्ह वर्तन आहे. मुद्दाम अपमानित करण्याच्या आणि शांतता भंग व्हावा या इराद्याने मोदींनी ही धमकावणीची भाषा वापरली आहे, याकडे राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यात आले.राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हे देशाच्या शासनव्यवस्थेचे सर्वोच्च प्रमुख असतात. त्यामुळे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळास सल्ला देणे व मार्गदर्शन करणे हे त्यांचे कर्तव्य ठरते, असे नमूद करून काँग्रेसने राष्ट्रपतींना विनंती केली की त्यांनी काँग्रेस अथवा अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्यांबद्दल किंवा अन्य कोणाही व्यक्तीविषयी अशी धमकावणीची भाषा व वापरण्याची मोदींना समज द्यावी.मोदींनी पातळी सोडली तरी पंतप्रधानपदाला कमीपणा येईल, अशी त्यांच्याविषयी वक्तव्ये आम्ही कधीच करणार नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वारंवार सांगत आले आहेत. कर्नाटकच्या प्रचारात मोदींनी विधिनिषेध सोडल्याने प्रचार संपताच काँग्रेसने त्यांच्याविषयीचे गाºहाणे राष्ट्रपतींकडे मांडले आहे.>मर्यादा सोडणे ही काँग्रेसचीच संस्कृतीभाजपाने लगेच पलटवार करून मर्यादा सोडून बेलगाम वक्तव्ये करणे ही काँग्रेसची संस्कृतीच असल्याचा आरोप करत सन २००९ पासून काँग्रेसच्या विविध नेत्यांनी केलेल्या विधानांची जंत्रीच जाहीर केली. त्यात काँग्रेस नेत्यांनी मोदींना गंदी नाले का कीडा, गंगू तेली, पागल कुत्ता, भस्मासूर, रावण, बंदर व उंदीर म्हटल्याचा उल्लेख आहे. सोनिया गांधी यांनी मोदींना ‘मौत का सौदागर’ व ‘जहर की केती करनेवाला’ म्हटल्याचेही भाजपाने स्मरण दिले. भाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन म्हमाले की, ज्यांनी शालीन भाषेची मर्यादा सोडण्याचा विक्रम केला आहे तेच मोदींवर बोट उगारत आहेत. पण दुसºयाकडे बोट दाखविताना चार बोटे स्वत:कडे असतात याचे त्यांनी भान ठेवावे. कर्नाटकमधील पराभव स्पष्ट दिसत असल्याने काँग्रेस तोंड लपविण्यासाठी काही तरी निमित्त शोधत आहे.>काय म्हणाले होते मोदी? : हुबळी येथील प्रचारसभेत मोदी म्हणाले होते, ‘काँग्रेस के नेता कान खोलकर सुन लीजिये. अगर सीमाओंको पार करेंगे, तो ये मोदी है. लेने के देने पड जायेंगे...’ . काँग्रेसने पत्रात मोदींची ही धमकी शब्दश: उद््धृत करून मोदींच्या त्या भाषणाचा यूट्युबवरचा व्हिडीओही राष्ट्रपतींना सादर केला.>काय आहे पत्रात?पंतप्रधान हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे. त्या पदाची शपथ या जबाबदारीची स्पष्ट जाणीव करून देते. भूतकाळात भारताच्या सर्व पंतप्रधनांनी सार्वजनिक वा खासगीतही आपले वर्तन उच्च पदाला साजेसे ठेवले आहे. त्यामुळे या पदावर असलेली व्यक्ती मुख्य विरोधी पक्षाच्या नेत्यांना उघडपणे धमकावणीची भाषा करेल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. पण मोदींनी मर्यादा सोडून नेमके हेच केले आणि पदाच्या शपथेचा भंग केला आहे.>या नेत्यांच्या स्वाक्षºयामाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खारगे, माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम, अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, कर्णसिंग, आनंद शर्मा, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी व मुकुल वासनिक इत्यादी काँग्रेस नेत्यांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठविले गेले.>त्यांचे वागणे पंतप्रधानपदाला बट्टा लावणारेहे पत्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी टष्ट्वीटरवर म्हटले की, हा पत्राचे निमित्त कर्नाटकमधील वक्तव्याचे असले तरी मोदींचे एकूणच वागणे पदाला न शोभणारे असून ते आपल्या वागण्याने पंतप्रधानपदाला सातत्याने बट्टा लावत आले आहेत.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी