पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरकडे वळविली पर्यटकांनी पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 06:02 AM2019-02-19T06:02:43+5:302019-02-19T06:03:01+5:30

शेकडो टुर्स पॅकेज रद्द : व्यावसायिकही हादरले, पर्यटनावर परिणाम

Lessons from tourists turned to Kashmir after the Pulwama terror attack | पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरकडे वळविली पर्यटकांनी पाठ

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरकडे वळविली पर्यटकांनी पाठ

Next

संजय पाठक

नाशिक : काश्मीर खोऱ्यातील अशांतता तसेच पुलवामा घटनेनंतर पर्यटकांत भीतीचे वातावरण असून, त्यामुळे ऐन पर्यटन हंगामात राज्यभरातून शेकडो पर्यटकांनी टूर्स रद्द केल्या आहेत. काश्मीरमध्ये पर्यटनावर अवलंबून असणाºया अर्थकारणाचा दहशतवादाला पाठिंबा मिळत असल्यानेही पर्यटकांना तेथे न नेण्याबाबत पर्यटन व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

पुलावामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४0 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. इतक्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे जाणाºया पर्यटकांमध्येच भीतीचे वातावरण आहे. मार्चपासून तेथे विशेष पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. पर्यटनाबरोबरच अनेक हनिमून पॅकेजेसही असतात. परंतु दहशतवादी घटना वाढत च्असतानाच, पुलवामामध्ये मोठा हल्ला झाल्याने पर्यटनक्षेत्र हादरले आहे. बहुतांशी पॅकेजेस पर्यटकांनीच रद्द केले असून, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्याही सहली रद्द करीत आहेत. तेथे पर्यटनासाठी जाण्याची आणि पर्यटकांचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाही, असे टूर्स कंपन्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरला पर्याय म्हणून हिमाचल प्रदेश, उटी, दार्जिलिंग या ठिकाणी पर्यटकांना पाठविले जात असून, हा भाग सुरक्षित असल्याने पर्यटकांनाही त्याच पॅकेजमध्ये कमी-अधिक दर करून जाण्यास तयार होत आहेत. पर्यटनच थांबल्याने त्याचा मोठा फटका काश्मिरी नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.

स्वत:हून टूर्स रद्द
पर्यटनातून मिळणारा पैसा काश्मीरच्या विकासापेक्षा दहशतवाद्यांना मदतीसाठी होत असल्याची चर्चा सध्या व्हॉट््सअ‍ॅपवर सुरू असून, त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी काश्मीरला टूर्स नेऊच नये, असे आवाहनही केले आहे. त्यामुळे व्यावसायिकही स्वेच्छेने टूर्स रद्द करीत आहेत.
- दत्ता भालेराव, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन आॅफ नाशिक
मुंबईतून अनेक टुर्स व्यावसायिकांनी काश्मीरच्या सहली रद्द केल्या आहेत. माझ्याकडे हनिमून कपलसह अलीकडेच नोंदविल्या गेलेल्या तीन सहली रद्द झाल्या आहे. पर्यटकांमध्ये भीती असून, त्यामुळे ते टूर रद्द करीत आहेत. टूर्स व्यावसायिकही संबंधितांना स्वत:च्या जबाबदारीवर जावे लागेल, असे सांगत आहेत. पर्यटक तिथे अडकल्यास त्यांना परत आणणे ही मोठी जोखीम आहे.
- दीपाली वागळे,
ट्रॅव्हल्स व्यावसायिक, मुंबई
 

Web Title: Lessons from tourists turned to Kashmir after the Pulwama terror attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.