शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

३५ वर्षांपूर्वी घेतलेल्या ‘मिराज’ने शिकविला धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:13 IST

भारतीय हवाई दलात 'मिराज' लढाऊ विमान आहेत. 1970 साली या विमानांचे डिझाइन तयार करण्यात आले होते. १९८४मध्ये राजीव गांधी ...

भारतीय हवाई दलात 'मिराज' लढाऊ विमान आहेत. 1970 साली या विमानांचे डिझाइन तयार करण्यात आले होते. १९८४मध्ये राजीव गांधी यांचे सरकार असताना ४९ मिराज लढाऊ विमाने खरेदीसाठी करार केला होता. त्या वेळी पाकिस्तान अमेरिकेकडून एफ-१६ विमाने खरेदी करणार होता आणि त्याला उत्तर देण्यासाठीच राजीव गांधी यांनी हा करार केला होता. द सॉल्ट या कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे. मिराज 2000 लढाऊ विमाने औपचारिकपणे २९ जून, १९८५ मध्ये भारतीय वायुसेनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. हवाई हल्ल्यासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो. कालांतराने कंपनीने मिराजमध्ये काही बदल करून त्याला अधिक सक्षम असे मल्टिरोल लढाऊ विमान बनविले.

पाकिस्तानात हवाई हल्ल्यासाठी मिराज-२000 विमानांचा वापर करण्यात आला होता. राफेल विमाने बनविणाऱ्या द सॉल्ट कंपनीनेच मिराज विमानांची निर्मिती केली आहे. ही विमाने १९८0च्या दशकात भारतीय हवाई दलात दाखल करून घेण्यात आली होती.हल्ला करण्यासाठी जीबीयू-१२ हा अमेरिकन बनावटीचा लेझर गाइडेड बॉम्बचा वापर करण्यात आला. अचूक व नेमका हल्ला हे या बॉम्बचे वैशिष्ट्य आहे.

हल्ला करीत असताना पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाल्यास, त्याचा सामना करण्यासाठी मिराज विमानांमध्ये मॅट्रा मॅजिक क्लोस कॉम्बॅट मिसाइल बसविण्यात आले होते. मॅट्रा ही कंपनीही फ्रान्समधील असून, हवेतून हवेत (एअर टू एअर) हल्ल्यासाठी या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात येतो.अशा प्रकारच्या हल्ल्यात लक्ष्याचा अचूक माग घेणे गरजेचे असते. जे आपले लक्ष्य आहे, त्यावर बॉम्बहल्ला करण्यासाठी लेझर पॉडचा वापर करण्यात आला. जगातील काही देशांतील हवाई दलांकडेच हे अत्याधुनिक पॉड असून, भारतीय हवाई दल त्यापैकी एक आहे.नियंत्रण रेषा ओलांडून १२ मिराज विमाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसली, तेव्हा भारतीय बनावटीच्या ‘नेत्र’ या एअरबोर्न अर्ली वॉर्निंग सीस्टिम असलेल्या ड्रोन विमानांद्वारे त्यांच्याशी संपर्क व समन्वय ठेवण्यात आला होता. ‘नेत्र’ हे विमान अत्याधुनिक रडारने सुसज्ज असून, हवाई हल्ले करताना टार्गेट शोधण्यासाठीही त्याचा वापर केला जातो.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक