दोन हजारांच्या नोटा गेल्या कुणीकडे? दैनंदिन व्यवहारातून गायब; छाप्यांमध्येही सापडेनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:28 IST2019-11-21T01:40:14+5:302019-11-21T06:28:39+5:30
प्राप्तिकर विभागासह अन्य यंत्रणांनी टाकलेल्या धाडींमध्येही 2 हजारांच्या नोटा आढळण्याचं प्रमाण कमी

दोन हजारांच्या नोटा गेल्या कुणीकडे? दैनंदिन व्यवहारातून गायब; छाप्यांमध्येही सापडेनात
नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागासह अन्य यंत्रणांनी विविध व्यक्ती, कंपन्या तसेच संस्थांवर घातलेल्या छाप्यांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या नोटा साठवल्या जात असून, त्या चलनातून बाद करण्यात याव्यात, अशी मागणी होत असताना, धाडींमध्येही त्या सापडत नसल्याने त्या गेल्या कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्र सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा आणल्या. त्यावेळी 500 व 1000 रुपयांच्या नोटा साठवून ठेवल्या जातात आणि त्यातून काळ्या पैशाचा उगम होतो, असे सांगिते होते. पण आता छाप्यांमध्ये मोठ्या मूल्याच्या नोटा आढळून येत नसल्याने आणि चलनातही त्यांचा वापर कमी होत असल्याने त्या गेल्या कुठे, असा प्रश्न विचारला जात आहे.