दबक्या पावलानं आधी घरात शिरला, मग अचानक केला हल्ला; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 21:53 IST2021-09-01T21:53:13+5:302021-09-01T21:53:43+5:30
leopard video : बिबट्या घरात घुसण्याची ही घटना कर्नाटकातील बांदीपूरमध्ये घडली आहे.

दबक्या पावलानं आधी घरात शिरला, मग अचानक केला हल्ला; पाहा VIDEO
बांदीपूर: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत रात्रीच्या अंधारात एक बिबट्या घरात घुसताना दिसत आहे. बिबट्या घरात घुसण्याची घटना कर्नाटकातील बांदीपूरची असून, घरातील सीसीटीव्हीमध्ये हू संपूर्ण घटना कैद झाली.
Claimed to be from Bandipur windflower last night.#Leopard@ParveenKaswan@rameshpandeyifs@Saket_Badola@htTweets@RandeepHooda@deespeak@TandonRaveena@ANI@PraveenIFShere@susantananda3pic.twitter.com/MmtJY7JWKt
— WildLense® Eco Foundation 🇮🇳 (@WildLense_India) August 31, 2021
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घराचा मुख्य दरवाजा उघडा आहे आणि रात्रीची अंधारात हा बिबट्या दबक्या पावलाने हळुहळू घरात शिरत आहेत. घरात येताच बिबट्या काळजीपूर्वक आजूबाजूला पाहतो, मग अचानक तो कुठल्यातरी कोपऱ्यात धावतो. कोपऱ्यात कोणाच्यातरी अंगावर गेल्याचं या व्हिडिओत वाटत आहे, पण नेमका तो कुणाच्या अंगावर गेला, याची माहिती मिळू शकलेली नाही.