तीन शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला
By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:21+5:302015-07-06T23:34:21+5:30
तळेगाव ढमढेरे : भोसेवस्ती व भीमाशेत येथील शेतकर्यांच्या तीन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये शेळ्या मृत्युमुखी पडल्या.

तीन शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला
त ेगाव ढमढेरे : भोसेवस्ती व भीमाशेत येथील शेतकर्यांच्या तीन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये शेळ्या मृत्युमुखी पडल्या. विठ्ठलवाडी हद्दीतील भोसेवस्ती येथील काळूराम आनंदराव गवारे व विठ्ठल नारायण गवारे तसेच तळेगाव ढमढेरे हद्दीतील भीमाशेत येथील सतीश श्यामराव ढमढेरे या तीन शेतकर्यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची वनपाल आर. बी. वाव्हळ, वनरक्षक बी. ए. गायकवाड, तलाठी एस. आर. शिरसाट यांनी पाहणी करून पंचनामा केला. या वेळी माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गवारे, सामाजिक कार्यकर्ते अमोल गवारे व ग्रामस्थ हजर होते. बिबट्याच्या दहशतीमध्ये परिसरातील शेतकरीवर्ग भयभीत झाल्याचे दिसत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता रात्रीच्या वेळी अधूनमधून फटाके वाजवावेत, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.