रेल्वेखाली महिलेचा पाय कापला रुळ ओलांडण्याच्या प्रयत्न : पाय ठेवताच रेल्वे झाली सुरू

By Admin | Updated: May 7, 2016 00:35 IST2016-05-07T00:35:10+5:302016-05-07T00:35:10+5:30

जळगाव : रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात उभी असलेली रेल्वे सुरू होऊन त्याखाली पाय आल्याने विजया धनराज सावकारे (३०, रा. गेंदालाल मिल परिसर) या महिलेचा पंजा कापला गेला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर घडली.

The legs of the woman under the train were crossed by the cross | रेल्वेखाली महिलेचा पाय कापला रुळ ओलांडण्याच्या प्रयत्न : पाय ठेवताच रेल्वे झाली सुरू

रेल्वेखाली महिलेचा पाय कापला रुळ ओलांडण्याच्या प्रयत्न : पाय ठेवताच रेल्वे झाली सुरू

गाव : रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात उभी असलेली रेल्वे सुरू होऊन त्याखाली पाय आल्याने विजया धनराज सावकारे (३०, रा. गेंदालाल मिल परिसर) या महिलेचा पंजा कापला गेला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर घडली.
विजया सावकारे या भुसावळ येथे जाण्यासाठी स्थानकावर गेल्या. तेथे त्यांनी भुसावळचे तिकीटही काढले. दुसर्‍या बाजूला रेल्वे येईल म्हणून त्या रुळावरून दुसर्‍या फलाटावर जात होत्या. स्थानकावर रेल्वे उभी असताना त्यांनी तेथून जाण्याचा प्रयत्न केला व रुळावर पाय ठेवला त्याच क्षणी रेल्वे सुरू झाली व त्यांच्या उजव्या पायाचा पंजा कापल्या गेला. सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही.
त्या वेळी तेथे काकडी विकणार्‍या काही लोकांनी महिलेला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले.

Web Title: The legs of the woman under the train were crossed by the cross