विधीमंडळ-दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकार-

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30

दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा

Legislature-Dahihandi Adventure Sports Type- | विधीमंडळ-दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकार-

विधीमंडळ-दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकार-

ीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा
- क्रीडा मंत्र्यांची विधानसभेत घोषणा

नागपूर - मुंबई, ठाण्याच्या संस्कृतीचा एक भाग असलेल्या दहीहंडी उत्सवाला यापुढे साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्यात येईल, अशी घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली.
दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देताना, या खेळासाठी आवश्यक नियमावली आखण्यात येईल. या क्रीडा प्रकारासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी सुरक्षा साधनांचा योग्य वापर करण्यासंदर्भात त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर दहीहंडीचा सहभाग करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासनही तावडे यांनी दिले. राज्यात क्रीडा संकुले उपलब्ध करु न देण्याबाबत छगन भुजबळ, रवी राणा, आशिष शेलार आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मुंबई शहर आणि उपनगरात चार क्रीडा संकुले उभारण्यात येतील, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. मुंबईसाठी २४ क्रीडा संकुलाची घोषणा मागील सरकारने केली होती, पण जागेअभावी एकही क्रीडासंकुल आकाराला येऊ शकले नाही. त्यामुळे याचा फेरविचार करून मुंबईत क्रीडासंकुल उभी राहावे, अशी मागणी सदस्यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)
------------------------
शैक्षणिक वर्षात बांधकाम पाडण्यास मनाई
शैक्षणिक वर्ष सुरू असताना एखाद्या शाळेतील अनधिकृत बांधकाम पाडले जाणार नाही, अशी हमी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याची दक्षता सरकार घेणार असल्याचेही ते म्हणाले. धारावी येथील श्री गणेश विद्यामंदिर शाळेची इमारत पाडल्याने विद्यार्थ्यांच्या होणार्‍या नुकसानीबाबत सुनील राऊत व वर्षा गायकवाड यांनी प्रश्न विचारला होता.

Web Title: Legislature-Dahihandi Adventure Sports Type-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.