दिग्गज कॉर्पोरेट्सची शपथविधीला उपस्थिती
By Admin | Updated: May 27, 2014 05:24 IST2014-05-27T05:24:04+5:302014-05-27T05:24:04+5:30
शपथविधीला देशातील सर्व प्रमुख उद्योग समूहांचे अध्यक्ष उपस्थित होते. यामध्ये रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी,तसेच त्यांच्या मातोश्री कोकिळाबेन उपस्थित होत्या

दिग्गज कॉर्पोरेट्सची शपथविधीला उपस्थिती
शपथविधीला देशातील सर्व प्रमुख उद्योग समूहांचे अध्यक्ष उपस्थित होते. यामध्ये रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी, दोन पुत्र तसेच त्यांच्या मातोश्री कोकिळाबेन उपस्थित होत्या; तर एडीएजी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानीही सपत्नीक उपस्थित होते. जेष्ठ उद्योगपती रतन टाटा, टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, विजय मल्ल्या, एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, काही कारणास्तव ते या सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत.