शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

जन्मदात्यांचा सांभाळ न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार-मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 5:41 PM

आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना कारवाईचा इशारा

इंफाळ- जन्मदात्यांचा सांभाळ न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचं मणीपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी म्हटलं आहे. आई-वडिलांचा सांभाळ करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचं सिंह म्हणाले. आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणतीही व्यक्ती आपल्या आई-वडिलांच्या आशीर्वादाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, असं बिरेन सिंह म्हणाले. मासिक जनता दरबारादरम्यान अनेक वृद्ध व्यक्ती त्यांच्या मुलांची तक्रार माझ्याकडे करतात. मुलं नीट सांभाळ करत नाहीत, अशी अनेकांची व्यथा असते, असं सिंह म्हणाले. 'आपल्या आई-वडिलांना योग्य वागणूक न देणारे, त्यांचा नीट सांभाळ न करणारे आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. आई-वडिलांचा आशीर्वाद असणाऱ्या व्यक्तीच त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात,' असं सिंह यांनी म्हटलं. मात्यापित्यांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी त्यांनी यावेळी दिली. 'राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आई-वडिलांचा सांभाळ न केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल,' असं सिंह म्हणाले. आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सिंह यांनी हा कारवाईचा इशारा दिला.  

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री