'माजी गुप्तहेरावर कायदेशीर कारवाई', पन्नूच्या हत्येच्या कटाबद्दल समितीने केंद्राला गुप्त अहवाल दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 19:57 IST2025-01-15T19:54:47+5:302025-01-15T19:57:29+5:30
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्याच्या अमेरिकेच्या आरोपांनंतर स्थापन झालेल्या भारत सरकारच्या उच्चाधिकार तपास समितीने आपला अहवाल सादर केला. या अहवालात सरकारला या कटात सहभागी असलेल्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

'माजी गुप्तहेरावर कायदेशीर कारवाई', पन्नूच्या हत्येच्या कटाबद्दल समितीने केंद्राला गुप्त अहवाल दिला
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू यांच्या हत्येच्या कट रचल्याप्रकरणी अहवाल तयार केला आहे. अहवालानुसार, आरोपी भारतीय एजंटविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तपासानंतर समितीने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. एजंटचे नाव अद्याप उघड केलेले नाही. २०२३ मध्ये न्यू यॉर्कमध्ये भारतीय एजंटांनी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा अमेरिकेचा आरोप झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
Kumbh Mela: कुंभमेळ्याला निघालेल्या भाविकांच्या बसला लागली आग; एकाचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी गृह मंत्रालयाने चौकशीनंतर एका व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाईची शिफारस केली आहे. गृह मंत्रालयाच्या विनंतीवरून कारवाई सुरू करण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
गृह मंत्रालयाने दिलेली माहिती अशी, काही संघटित गुन्हेगारी गट, दहशतवादी संघटना, ड्रग्ज तस्कर इत्यादींच्या कारवायांबद्दल अमेरिकन अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये भारत सरकारने एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती.
समितीने स्वतःच तपास केला आणि अमेरिकेने दिलेल्या पुराव्यांचेही परीक्षण केले. अमेरिकन अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळाले, त्यानंतर विविध एजन्सींमधील अनेक अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आणि या संदर्भातील महत्त्वाचे कागदपत्रे देखील तपासण्यात आली, असंही मंत्रालयाने सांगितले.
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'दीर्घ चौकशीनंतर समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. आरोपीचा मागील गुन्हेगारी रेकॉर्ड आणि पार्श्वभूमी तपासल्यानंतर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची शिफारस केली जाते. समितीने शिफारस केली आहे की कायदेशीर कारवाई जलदगतीने पूर्ण करावी.
पन्नूने धमकी दिली होती
काही दिवसापूर्वी अमेरिकेत राहणारा खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने धमकीचा ई-मेल पाठवला होता. पन्नूने धमकीच्या ई-मेल आणि व्हिडिओ संदेशांद्वारे ओडिशामध्ये होणाऱ्या प्रवासी भारतीय दिवसाच्या समारंभात व्यत्यय आणण्याची धमकी दिली होती. यावेळीही, ईमेल आणि व्हिडिओ संदेश ओडिशाचे ज्येष्ठ पत्रकार अक्षय साहू यांना आला होता.