शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या पत्नीला सोडणारे, दुसऱ्यांच्या सीडी काढताहेत, हार्दिक पटेलची खरमरीत टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 13:59 IST

कथित अश्लील सीडी प्रकरणामुळे वादात अडकलेला पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल यांने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खरमरीत टीका केली आहे.

अहमदाबाद - कथित अश्लील सीडी प्रकरणामुळे वादात अडकलेला पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल यांने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खरमरीत टीका केली आहे. आयुष्यात ज्यांना आपल्या पत्नीला साथ देता आली नाही ते दुसऱ्यांच्या सीडी काढताहेत, अशी टीका हार्दिक पटेलने ट्विटरवरून केली आहे. अश्लील सीडी प्रकरणानंतर गुरुवारी रात्री एक ट्विट करून मोदींसह भाजपावर विविध मुद्यांवरून निशाणा साधला आहे. हार्दिक पटेलने ट्विटरवर एक कविता शेअर केली आहे. त्या कवितेमध्ये संघाची स्वातंत्र्य लढ्यातील अलिप्तता, गांधींची हत्या, हिंदू-मुस्लिम दंगली आणि मोदी आणि त्यांच्या पत्नीमधील संबंध यांचा उल्लेख करण्यात आला आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसांचाच अवधी राहिला असताना हार्दिक पटेलचे कथित सेक्स व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. त्या माध्यमातून हार्दिक पटेलचे चारित्र्य हनन करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. या आठवड्यात हार्दिक पटेलच्या सुमारे पाच ते सहा सीडी व्हायरल करण्यात आल्या आहेत.क्लीपपैकी एका क्लीपमध्ये हार्दिक पटेल हा मुंडन आंदोलनामध्ये मुंडन केल्यानंतर मौजमजा करताना दिसत आहे. पाटीदार आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्यांना आदरांजली वाहून गुजरात  सरकारचा निषेध करण्यासाठी हार्दिक पटेलसह पाटीदार नेत्यांनी मुंडन केले होते. या सीडींनंतर हार्दिकने विरोधकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पाटीदार नेता हार्दिक पटेल याचे कथित सेक्स व्हिडीओ सध्या गुजरातमधील राजकीय वादविवादाचा विषय बनले आहेत.  दरम्यान हार्दिक पटेलने 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? असा सवालही केला होता. 'सत्तेत बसलेले लोक दावा करत आहेत की हा माझा व्हिडीओ आहे. पण माझं म्हणणं आहे की हा बनावट आहे. हा व्हिडीओ माझ्यासारख्या दिसणा-या एखाद्या व्यक्तीचा आहे. हा व्हिडीओ मी परदेशात राहणा-या माझ्या काही ओळखीच्या लोकांना फॉरेन्सिक चाचणी कऱण्यासाठी पाठवला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ बनावट आहे', असे हार्दिक पटेलने सांगितले होते. 'आणि काही वेळासाठी मान्यही केलं की व्हिडीओमधील व्यक्ती मी आहे, तरी मला विचारायचं आहे की 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? जर का 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड नसेल, तर काय मग 50 वर्षाच्या व्यक्तीची असणार का ? अटलबिहारी वाजपेयी एकदा बोलले होते की, मी विवाहित नाहीये, पण संन्याशीही नाही. एका भाजपा आमदाराने चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला, पण त्यावर भाजपा काहीच बोलत नाही. ही लढाई भाजपा विरुद्ध काँग्रेस नाही, तर भाजपा विरुद्ध हार्दिक आहे', असं हार्दिक पटेलने म्हटले होते.  

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदी