शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

विधायक कार्याचा वसा घेतलेला नेता : ब्रšादेवदादा माने लोकनेते स्व. ब्रšादेवदादा माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज (सोमवारी) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2015 22:55 IST

राजकारण, सहकार व शैक्षणिक कार्यात लोकनेत्यांनी समाजहिताला प्राधान्य देऊन दूरदृष्टीने, नि:स्वार्थीपणे काम केले पाहिजे, असा विचार महात्मा फुले यांच्या समतेच्या बांधीलकीतून पुढे आला. सोलापूरचे ब्रšादेवदादा माने यांचे वर्तन राजकारणात राहूनही काहीअंशी महात्मा फुल्यांच्या विचारांशी मिळतेजुळते होते.

राजकारण, सहकार व शैक्षणिक कार्यात लोकनेत्यांनी समाजहिताला प्राधान्य देऊन दूरदृष्टीने, नि:स्वार्थीपणे काम केले पाहिजे, असा विचार महात्मा फुले यांच्या समतेच्या बांधीलकीतून पुढे आला. सोलापूरचे ब्रšादेवदादा माने यांचे वर्तन राजकारणात राहूनही काहीअंशी महात्मा फुल्यांच्या विचारांशी मिळतेजुळते होते.
जात व धर्माच्या जाणिवा असलेल्या संघटना ब्रšादेवदादा माने यांना राजकारणात मान्य नव्हत्या. कोणत्याही दगडाला शेंदूर फासून त्याच्यात देवपण शोधणार्‍यांपैकी दादा नव्हते. परिश्रमपूर्वक जनसेवा व जनसंपर्काच्या माध्यमातून कार्यकर्ता सचोटीला उतरला तरच समाजाने त्याची कदर केली पाहिजे, असा दादांचा आग्रह असायचा. तोच आग्रह राजकारण निरोगी करण्याला उपयोगी पडतो. ब्रšादेवदादा माने यांचे नेतृत्व आणि कार्यकर्तृत्व स्वत:च्या पायावर उभे राहून साध्य झालेले आहे. कोणाच्या आशीर्वादाने त्यांनी राजकारणात प्रवेश केला नाही की, राजकारणातली त्यांची एंट्री अपघात नाही. समाजाच्या सेवेतून त्यांचे नेतृत्व पुढे आले. राजकारणात स्थिरावले आणि विचाराने ते नेतृत्व बहरत राहिले.
एखाद्या नेत्याची कार्यपद्धती व विचारसरणी जनहिताच्या विरोधी असेल तर त्याविरोधी दादा उघडपणे भूमिका घेत असत. क˜र काँग्रेसवादी असूनही दादांनी अनेकदा काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. १९७१ साली लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. निवडणूक प्रचाराची टिळक चौकात मोठी सभा झाली. या सभेत दादांनी रंगाअण्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे धाडस दाखवले. त्या निवडणुकीत त्यांनी अपार कष्ट घेतले. नवखे असूनही ग्रामीण भागात झंझावाती दौरे करीत काँग्रेसच्या विरोधात रान उठवले. त्यांचा पिंड मुळात काँग्रेसचा. तरीही अन्याय झाला की, पक्षाच्या विरोधात ते पेटून उठत असत. १९६७ साली दादांचे नातलग राजाराम ढवळे यांना काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी दिली. उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ब्रšादेवदादांकडे आग्रह धरीत निवडणूक रिंगणात उतरवले. त्यांचे बंड यशस्वी ठरले. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेससोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या काळात अनेकदा अशा घटना त्यांच्याबाबत घडल्या.
राजकीय क्षेत्रातील व्यक्तीने रचनात्मक काम उभे करावे, अशी अपेक्षा असते. अशा रचनात्मक कामाचा राजकीय लाभ जरी त्या व्यक्तीला होण्याची शक्यता असली तरी त्या कार्याचा तो हेतू असू नये. अशी विचारसरणी ब्रšादेवदादांची होती. त्यांनी स्वत:च्या गावी कुमठे येथे आपल्या रचनात्मक कामाचा डोंगर उभारला आहे. बालवाडीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण एका छताखाली देणारी शिक्षण संस्था दादांनी कुमठ्यात उभी केली आहे. अनेक नेते शहरात राहून गावाची काळजी करतात. परंतु ब्रšादेवदादा माने यांची नाळ कुमठ्याशी अखेरपर्यंत जोडलेली राहिली. त्यांच्यामुळे गावाला नवी ओळख मिळाली.
साधा, सरळमार्गी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी धडपडणारा नेता अशी ब्रšादेवदादांची जिल्‘ाला ओळख होती. त्यांचा स्पष्टवक्तेपणा कधी कधी अडचणीचा ठरायचा. त्यामुळे राजकारणापेक्षा समाजकारणात दादा अधिक रमले. शेती त्यांचा जीव की प्राण. सूर्योदयापूर्वी शेतात जाऊन कामाचे नियोजन करायचे. सकाळपासून कार्यकर्त्यांची त्यांना भेटण्यासाठी शेतात रीघ लागायची. आधी काम करा आणि मग राजकारण करा, तरच येणारा काळ तुमचा राहील, असा सल्ला ते देत असत. त्यामुळेच निरुद्योगी माणसे दादांच्या जवळ जायला कचरत असत. यशवंत बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे संसार उभे केले. गरजूंना मदतीचा हात दिला. पैशांअभावी शिक्षण खंडित केलेल्या तरुणांना त्यांनी बँकेकडून कर्ज दिले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वत:च्या शिक्षण संस्थेत नोकरी दिली. जात पाहून नव्हे तर गरज पाहून बँकेत, शिक्षण संस्थेत ते सामावून घेत असत. त्यांचा कनवाळूपणा कधी कधी अडचणीचा ठरायचा. परंतु त्यांनी कधी कशाची फिकीर केली नाही. राजकारणात राहून समाजहित साधणारा हा ग्रामीण नेता होता.