दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर कांड प्रकरणातील नेत्याला जामीन मंजूर; अश्लील व्हिडीओ झाला होता व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 00:10 IST2025-05-26T23:52:31+5:302025-05-27T00:10:05+5:30
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर एका तरुणीसोबत उघडपणे संबंध ठेवणारे नेते मनोहर लाल धाकड यांना जामीन मिळाला आहे.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर कांड प्रकरणातील नेत्याला जामीन मंजूर; अश्लील व्हिडीओ झाला होता व्हायरल
दिल्ली- मुंबई एक्सप्रेस वेवर एका तरुणीसोबत उघडपणे अश्लील कृत्य करणारे भाजपा नेते मनोहर लाल धाकड यांना जामीन मिळाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारावई केली. कालच त्यांना अटक करण्यात आली होती. दिल्ली मुंबई एक्सप्रेस ८ लेनवर मनोहरलाल धाकड अश्लील कृत्य करतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओसाठी त्यांना ब्लॅकमेलही करण्यात आले होते.
विक्रोळीत कन्नमवार नगरमध्ये तीन तरुणांच्या अंगावर झाड कोसळले; एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओ व्हायरल न करण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी फक्त २०,००० रुपये दिले. यामुळे त्याने व्हिडीओ व्हायरल केला. पोलिसांनी या प्रकरणी एनएचएआयला पत्र पाठवून माहिती मागितली आहे. सध्या व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
मनोहरलाल धाकड याला रविवारी अटक
मंदसौर जिल्ह्यातील भानपुरा पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि रविवारी धाकडला अटक केली होती.
मंदसौर जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई ८ लेन एक्सप्रेसवेवर २२ मे रोजी आक्षेपार्ह अश्लील कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये मनोहरलाल धाकड गाडीतून खाली उतरताना आणि मुलीसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसले.
१ लाख रुपयांची मागणी केली
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून १ लाख रुपयांची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी २०,००० रुपये रोख देण्यात आले. त्यापैकी एकाने उर्वरित ८०,००० रुपयांसाठी व्हिडीओ व्हायरल केला.
व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या पोलिसांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कर्मचाऱ्यांची माहिती मागितली आहे. ३ कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.