'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 19:25 IST2025-04-30T19:24:47+5:302025-04-30T19:25:48+5:30

खरे तर, 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या, महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि सलमान खानच्या गरावरील हल्ला. या काही मोठ्या घटनांमुळे गँगस्टर लॉरेंस बिश्नोईची दहशत वाढली आहे. 

lawrence bishnoi gang threatens pakistan will kill just one which will be equal to a lakh after pahalgam attack | 'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?

'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?

लॉरेंस बिश्नोई गँगने जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. या गँगच्या धमकीशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात, पहलगाम दहशतवदी हल्ल्यात निर्दोष लोकांची हत्या झाली. याला उत्तर देण्यासाठी आम्ही पाकिस्तानात घुसून एका अशा व्यक्तीला मारणार, जो एक लाखाच्या बरोबरीचा असेल. या पोस्टसोबत दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा फोटोही लावण्यात आला आहे आणि त्यावर क्रॉस करण्यात आले आहे. हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे.

भारतात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने अनेक वेळा सोशल मीडियावरून आपल्या गुन्ह्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. आता संबंधित पोस्टमध्ये किती तथ्य आहे आणि ही पोस्ट खरोखरच या गँगने केली का? हे निश्चित होऊ शकलेले नाही. मात्र, ही पोस्ट सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

लॉरेंस बिश्नोईवर पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचा आरोप -
खरे तर, यापूर्वी लॉरेंस बिश्नोई गँगवर पाकिस्तानी गँगस्टर आणि डॉनसोबत संबंध असल्याचे आरोपही होत आले आहेत. लॉरेंस बिश्नोई आणि पाकिस्तान संबंधांसंदर्भात बोलताना पोलिसांनी अनेक वेळा पुरावेही दिले आहेत. मात्र, जेलमधून झालेल्या लॉरेंस बिश्नोईच्या कथित मुलाखतीत त्याने हे फेटाळले आहे. एवढेच नाही तर, लॉरेंस बिश्नोईने स्वतःला देशभक्त म्हणत, आपले देशाच्या शत्रूशी कसल्याही प्रकारचे संबंध नाही, असा दावा केला होता.

खरे तर, 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या, महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि सलमान खानच्या गरावरील हल्ला. या काही मोठ्या घटनांमुळे गँगस्टर लॉरेंस बिश्नोईची दहशत वाढली आहे. 

Web Title: lawrence bishnoi gang threatens pakistan will kill just one which will be equal to a lakh after pahalgam attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.