देशातील कायद्याची अवस्था वेश्येपेक्षाही वाईट - पप्पू यादव

By Admin | Updated: September 7, 2014 13:34 IST2014-09-07T13:34:04+5:302014-09-07T13:34:04+5:30

राष्ट्रीय जनता दलाचे नेते पप्पू यादव यांनी देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेची तुलना थेट वेश्येशी केली आहे. पप्पू यादव यांच्या या बेताल वक्तव्यावर सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.

Law of the land worse than prostitution - Pappu Yadav | देशातील कायद्याची अवस्था वेश्येपेक्षाही वाईट - पप्पू यादव

देशातील कायद्याची अवस्था वेश्येपेक्षाही वाईट - पप्पू यादव

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ७ -  लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्याची तुलना वेश्येशी करणारे राष्ट्रीय जनता दलाचे नेते पप्पू यादव यांनी आता देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेची तुलना थेट वेश्येशी केली आहे. पप्पू यादव यांच्या या बेताल वक्तव्यावर सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे. 
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आणि खासदार पप्पू यादव यांच्याशी पत्रकारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना पप्पू यादव यांची जीभ घसरली. यादव म्हणाले, देशातील कायदा व्यवस्थेची अवस्था मोठ्या भांडवलदारांच्या घरी ठेवलेल्या बाईसारखी झाली आहे. कायदा व्यवस्था सर्वसामान्यांसाठी कामच करत नाही. देशातील कायद्याची अवस्था वेश्येपेक्षाही बत्तर असल्याचे माझे वैयक्तीक मत असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.  पप्पू यादव पुरुलिया शस्त्रास्त्रप्रकरणातील आरोपी असून वर्षभरापूर्वीच हत्येच्या खटल्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली आहे.  

Web Title: Law of the land worse than prostitution - Pappu Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.