शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या सहा वर्षांत लष्कराला मिळाला तब्बल ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा

By बाळकृष्ण परब | Updated: September 29, 2020 16:32 IST

२०१४ ते २०२० या काळात जो निकृष्ट दर्जाचा दारुगोळा खरेदी केला गेला त्याची किंमत जवळपास ९६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचत आहे

ठळक मुद्देभारतीय लष्कराकडून खरेदी कऱण्यात येणाऱ्या दारुगोळ्याबाबत धक्कादायक माहिती समोरऑर्डिनन्स फॅक्ट्री बोर्डाकडून खरेदी केलेल्या दारुगोळ्यापैकीत तब्बल ९६० कोटी रुपयांचा दारुगोळा निकृष्ट दर्जाचाया किमतीत लष्कराला तब्बल १०० आर्टिलरी गन खरेदी करता आल्या असत्या

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती अजून थोडी बिघडली तरी युद्धाला तोंड फुटू शकते, असे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भारतीय लष्कराकडून खरेदी कऱण्यात येणाऱ्या दारुगोळ्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये सरकारी ऑर्डिनन्स फॅक्ट्री बोर्डाकडून खरेदी केलेल्या दारुगोळ्यापैकीत तब्बल ९६० कोटी रुपयांचा दारुगोळा निकृष्ट दर्जाचा होता. एवढ्या किमतीत लष्कराला तब्बल १०० आर्टिलरी गन खरेदी करता आल्या असत्या, असा दावा लष्कराच्या एका अंतर्गत अहवालात करण्यात आला आहे.लष्कराकडील हा अंतर्गत अहवाल संरक्षण मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. २०१४ ते २०२० या काळात जो निकृष्ट दर्जाचा दारुगोळा खरेदी केला गेला त्याची किंमत जवळपास ९६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचत आहे, असे या अहवालात म्हटले होते. एवढ्या किमतीमध्ये १५०-एमएम च्या मध्यम आर्टिलरी गन खरेदी करता आला होता.ऑर्डिनन्स फॅक्ट्री बोर्ड हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. तसेच ही संस्था जगातील सर्वात जुन्या सरकारी ऑर्डिनन्स प्रॉडक्शन युनिटमधील एक आहे. या अंतर्गत लष्करासाठी दारुगोळा तयार केला जातो. या ऑर्डिनन्स बोर्डाकडून मिळालेल्या २३ एमएम एअर डिफेन्स शेल, आर्टिलरी शेल, १२५ एमएम टँक राऊंडसह वेगवेगळ्या प्रकारच्या कॅलिबर बुलेटचा समावेश आहे.

निकृष्ट प्रकारच्या दारुगोळ्यामुळे केवळ आर्थिक नुकसान झालेले नाही तर जीवितहानीसुद्धा झालेली आहे. सरासरीत सांगायच झाल्यास निकृष्ट दारुगोळ्यामुळे आठवड्याला एक अपघात होतोय, असे लष्कराच्या या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. २०१४ पासून निकृष्ट प्रकारच्या दारुगोळ्यामुळे ४०३ च्या आसपास अपघात झाले आहेत. यामध्ये २७ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर १५९ जवान जखमी झाले आहेत. यावर्षीसुद्धा आतापर्यंत १३ अपघात झाले आहेत. मात्र त्यात कुणाचा मृत्यू झालेला नाही. ९६० कोटींच्या निकृष्ट दर्जाच्या दारुगोळ्यापैकी ६५८ कोटी रुपयांच्या दारुगोळ्याचा खर्च हा २०१४ ते २०१९ दरम्यान झाला. तर ३०३ कोटी रुपयांचा दारुगोळा महाराष्ट्रात लागलेल्या आगीनंतर नष्ट करण्यात आला होता. आता गेल्या दोन वर्षांपासून दारुगोळ्याच्या पुरवठ्यासाठी लष्कराकडून खासगी क्षेत्राकडे वळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून ओएफबीमध्ये बदल करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार