़़अखेर त्याने दुसर्‍या पत्नीलाही स्वीकारले !

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:22+5:302015-02-14T23:51:22+5:30

At last he accepted another wife! | ़़अखेर त्याने दुसर्‍या पत्नीलाही स्वीकारले !

़़अखेर त्याने दुसर्‍या पत्नीलाही स्वीकारले !

>जळगाव - पहिली पत्नी हयात असतानाही दुसरे लग्न करून दुसर्‍या पत्नीला वार्‍यावर सोडणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील संगमेश्वर येथील लक्ष्मण पवार यांनी अखेर सुखाचा संसार करण्याचे महिला साहाय्य कक्षाच्या पदाधिकार्‍यांना वचन देऊन दुसर्‍या पत्नीला घरी नेले.
पिंपळगाव हरेश्वर येथील प्रतिभा लक्ष्मण पवार (मूळ नाव परवीन शाह शब्बीर) यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी लक्ष्मण पवार यांच्याशी झाला होता.त्यानंतर कोपरगाव परिसरातील देवीच्या मंदिरावर हिंदू विवाह पद्धतीनुसार त्यांचा विवाह झाला होता़ लग्नापूर्वी काही दिवस आधी पवार यांचा विवाह झाला असल्याचे प्रतिभा यांना समजले. तरीही त्यांनी त्यांना स्वीकारले़ मात्र नंतर पवार यांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली़ त्यांना व त्यांच्या मुलाला वार्‍यावर सोडून पवार निघून गेले होते़ त्यानंतर प्रतिभा यांनी महिला दक्षता समितीच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधला. पदाधिकार्‍यांनी पवार यांच्याशी संपर्क साधला होता़ सुरुवातीला पवार यांनी टाळाटाळ केली़ मात्र पदाधिकार्‍यांनी खाक्या दाखविल्यानंतर दहा दिवसानंतर ते जळगावला आले. प्रतिभा यांना दहा दिवसांसाठी आशादीप वसतीगृहात ठेवण्यात आले होते़ पदाधिकार्‍यांनी दोघांच्या वादात मध्यस्थी केली़ त्यानंतर पती-पत्नीमध्ये तडजोड झाली़ प्रतिभा यांना सुखात नांदविण्याचे लेखी आश्वासन देऊन पवार त्यांना संगमेश्वर येथे घेऊन गेले़ (प्रतिनिधी)

Web Title: At last he accepted another wife!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.