शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर पाच वर्षांत 446 कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 08:41 IST

Narendra Modi : पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चाविषयी लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता.

ठळक मुद्दे गेल्या 5 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर 446 कोटी 52 लाख रूपये खर्च.2015-16 या कालावधीत परदेश दौऱ्यावर सर्वाधिक खर्च झाला आहे. 2019-20 या कालावधीत त्यांच्या दौऱ्यावर  46.23 कोटी रूपये खर्च करण्यात आले.

नवी दिल्ली - गेल्या 5 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर 446 कोटी 52 लाख रूपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चाविषयी लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी याला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिली. 2015-16 या कालावधीत परदेश दौऱ्यावर सर्वाधिक खर्च झाला आहे. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमध्ये झालेल्या खर्चांमध्ये चार्टर्ड विमानांचा खर्चाचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

 '2015-16 मध्ये 121 कोटी 85 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. 2016-17 मध्ये 78.52 कोटी, 2017-18 मध्ये 99.90 कोटींचा खर्च झाला आहे. तर 2018-19 मध्ये 100.02 कोटी खर्च करण्यात आले आहेत. तसेच 2019-20 या कालावधीत त्यांच्या दौऱ्यावर  46.23 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत' अशी माहिती मुरलीधरन यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांमध्ये किती खर्च करण्यात आला याबाबत सवाल करण्यात आला होता. यावर परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी लेखी उत्तराद्वारे माहिती दिली आहे. 

पंतप्रधान मोदींनी सर्वाधिक परदेश दौरे केले आहेत. मोदींनी एकाचवेळी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. एकदा प्रवास सुरू झाल्यावर ते बऱ्याच देशांना भेटी देऊन परततात. त्यामुळेच त्यांनी जास्त देशांना भेटी देऊनही त्यांच्या प्रवासावरील खर्च कमी आहे. 2015 मध्ये मोदींनी एकाच दौऱ्यात उझबेकिस्तान, कझाकस्तान, रशिया, तुर्कमेनिस्तान, किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तानला भेटी दिल्या होत्या. मोदींनी त्यांच्या 16 पेक्षा अधिक दौऱ्यांमध्ये एकाहून जास्त देशांना भेटी दिल्या. 

चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे.  कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'होली मिलन' कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून दिली आहे. जगभरातील तज्ज्ञ सांगत आहेत की, कोरोना व्हायरस (COVID-19) टाळण्यासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये, मोठ्या संख्येने लोक एकत्रित केले जाऊ नयेत. यासाठी यावर्षी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

China Coronavirus : 'राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवाल

भाजप सरकारच्या काळात २000 कोटींची अनियमितता, कॅगचा ठपका

कोरोना विषाणू आता नोटिफाइड, आरोग्य विभागाची माहिती

कंपन्यांकडूनही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना अन् विशेष प्रशिक्षण; प्रवासाबाबत नवे नियम

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत