शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दुर्घटना: भूस्खलन होऊन दरडीखाली गाडली गेली बससह अनेक वाहने, ४० जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 14:40 IST

Landslide in Kinnaur: हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील निगुलसेरी येथे राष्ट्रीय महामार्ग-५ वरील चील जंगलजवळ भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली आहे.

किन्नौर (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील निगुलसेरी येथे राष्ट्रीय महामार्ग-५ वरील चील जंगलजवळ भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. (Landslide in Kinnaur)भूस्खलन होऊन कोसळलेल्या दरडीखाली एचआरटीसीची एक बस सापडली असून, तेथून जात असलेल्या अनेक गाड्याही ढिगाऱ्याखाली सापडल्या आहेत. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळावर रवाना झाले आहे. ( Landslide buried several vehicles including a bus, 40 people missing)

दुर्घटनेमध्ये दरडीखाली सापडलेली बस किन्नौर जिल्ह्यातील मुरंग-हरिद्वार मार्गावरील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून याला कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही. भूस्खलनादरम्यान, कड्यावरून मोठ्या प्रमाणात दगडमातीचा ढिगारा खाली आल्याने अनेक वाहने खाली दबली आहेत. एचआरटीसीच्या बसमध्ये किती प्रवासी होते हे, समजू शकलेले नाही. अपघात झाल्यानंतर बस कड्यावरून खाली कोसळल्याचे सांगण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

समोर येत असलेल्या माहितीनुसार बसच्या ड्रायव्हरने घटनास्थळावरून माहिती दिली आहे की, या बसमधून ३५ ते ४० जण प्रवास करत होते. किन्नौरमधील भावनगर येथे हा अपघात झाला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र याबाबत केवळ काही माहिती मिळाली आहे. बससोबतच काही इतर वाहनेही खाली दबली आहेत. एनडीआरएफच्या टीमलाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे. तसेच पोलीस आणि प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, किन्नौर येथील सांगला-छितकूल मार्गावर २५ जुलै रोजी भूस्थलन होऊन मोठी दुर्घटना घडली होती. येथे पर्वतावरून दगड पर्यटकांच्या वाहनावर कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण जखमी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये सातत्याने भूस्खलनाच्या घटना घडत आहेत.  

टॅग्स :landslidesभूस्खलनAccidentअपघातHimachal Pradeshहिमाचल प्रदेश