शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये भूस्खलन. १३ जण ढिगाऱ्याखाली अडकले; बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 11:50 IST

उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे.

उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग जिल्ह्यात पुन्हा एकदा भूस्खलनाची घटना घडली आहे. काही वेळापासून गौरीकुंडमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे दरड कोसळल्याने सुमारे १३ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.  गुरुवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. टेकडीवरून सतत दगड कोसळत असल्याने बचाव पथकाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. रुद्रप्रयाग पोलिस, एसडीआरएफ, डीडीआरएफसह अनेक पथके बचावकार्यात गुंतली आहेत, मात्र बेपत्ता लोकांची माहिती अद्याप मिळालेली नाही.

हरियाणाच्या ५ जिल्ह्यांमध्ये ९३ FIR, १७६ जणांना अटक; २३०० व्हिडिओ पोलिसांच्या रडारवर

गुरुवार संध्याकाळपासून रुद्रप्रयागच्या गौरीकुंडमध्ये पाऊस पडत आहे. रात्री उशिरा पाऊस अधिक बरसला. मुसळधार पावसामुळे डोंगरावर दरड कोसळून दोन दुकानांचे नुकसान झाले. दुकानात  काम करणारे सुमारे १३ लोक ढिगाऱ्याखाली दबले . भूस्खलनाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.

भूस्खलन झाल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, एसडीआरएफ आणि डीडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. मात्र, मुसळधार पावसामुळे रात्रीच्या वेळी दुकानांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची सुटका होऊ शकली नाही. यातील काही लोक स्थानिक तर काही नेपाळमधील आहेत.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, रात्री १२ वाजण्याच्या सुमारास डाक पुलियाजवळ भूस्खलन झाले. माहिती मिळताच घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र मुसळधार पावसामुळे बचावकार्य थांबवावे लागले. आता सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आपत्ती व्यवस्थापन पथकाने एक यादी जारी केली असून त्यात १३ जणांची नावे आहेत. मात्र, हे लोक बेपत्ता आहेत की नदीत वाहून गेले आहेत की ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडRainपाऊसmonsoonमोसमी पाऊस