Ram Mandir: दोन कोटींची जमीन १८.५ कोटींना; राममंदिर जमीन खरेदीत मोठ्या घोटाळ्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 05:43 AM2021-06-14T05:43:13+5:302021-06-14T05:43:25+5:30

राममंदिरासाठी जमीन खरेदीसंदर्भात समाजवादी पक्षाचे माजी आमदार पवन पांडेय यांनी केलेल्या आरोपावर मी काही भाष्य करण्याआधी आरोपांचा अभ्यास करीन, असे श्री राम मंदिर ट्रस्टचे महासचिव आणि विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ नेते चंपत राय यांनी म्हटले.

Land worth Rs 2 crore buys for Rs 18.5 crore; Allegations of big scam in Rammandir land purchase | Ram Mandir: दोन कोटींची जमीन १८.५ कोटींना; राममंदिर जमीन खरेदीत मोठ्या घोटाळ्याचा आरोप

Ram Mandir: दोन कोटींची जमीन १८.५ कोटींना; राममंदिर जमीन खरेदीत मोठ्या घोटाळ्याचा आरोप

googlenewsNext

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी अयोध्येतील राममंदिरासाठी राममंदिर ट्रस्टने खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळ्यांचा आरोप केला आहे. संजय सिंह म्हणाले की, ट्रस्टने दोन कोटी रुपयांची जमीन १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली होती. दोन्ही देवघेव पाच मिनिटांत केली गेली, असाही त्यांचा दावा आहे.

संजय सिंह यांचा दावा आहे की, राममंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या इशाऱ्यावर देवाण-घेवाण केली गेली होती.  ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि अयोध्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय रजिस्ट्रीचे साक्षीदार होते, असे सांगून सिंह यांनी या व्यवहाराची सीबीआय आणि ईडीकडून चौकशीची मागणी केली.

संजय सिंह म्हणाले की, ‘मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या नावावर इतका मोठा घोटाळा ऐकून तर  पायाखालची जमीन निसटून जाईल. हा देशातील कोट्यवधी लोकांच्या आस्थेवर आघात आहे. 

आरोपांचा अभ्यास
आधी करीन : राय

राममंदिरासाठी जमीन खरेदीसंदर्भात समाजवादी पक्षाचे माजी आमदार पवन पांडेय यांनी केलेल्या आरोपावर मी काही भाष्य करण्याआधी आरोपांचा अभ्यास करीन, असे श्री राम मंदिर ट्रस्टचे महासचिव आणि विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ नेते चंपत राय यांनी म्हटले. पूर्वी अनेक आरोप झाले आहेत. एवढेच काय महात्मा गांधी यांच्या हत्येचाही आरोप झाला आहे.

Web Title: Land worth Rs 2 crore buys for Rs 18.5 crore; Allegations of big scam in Rammandir land purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.