शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आता तेजस्वी यादव ईडीच्या रडारवर, लँड फॉर जॉब प्रकरणी होणार चौकशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 08:46 IST

Land For Job Scam : आज ईडी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची चौकशी करणार आहे. 

पाटणा : बिहारमधील सत्तांतरानंतर आता सर्वांच्या नजरा राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या ईडी चौकशीकडे लागल्या आहेत. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणात  (Land For Job Scam) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी लालू प्रसाद यांची यांची ९ तासांपेक्षा जास्त चौकशी केली. आज ईडी त्यांचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची चौकशी करणार आहे. 

तेजस्वी यादव मंगळवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी २२ डिसेंबर आणि ५ जानेवारीला ईडीने तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी बोलावले होते, परंतु ते दोन्ही वेळेस ईडीसमोर हजर झाले नाहीत. यापूर्वी, ११ एप्रिल २०२३ रोजी ईजीने या प्रकरणी तेजस्वी यादव यांची ८ तास चौकशी केली होती.

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर एका दिवसानंतर ईडीने तेजस्वी यादव यांना चौकशीची नोटीस दिली आहे. लँड फॉर जॉब प्रकरणात ईडीने तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादव यांना १९ जानेवारीला नोटीस पाठवली होती. सोमवारी लालू यादव यांची ईडीने तब्बल ९ तास चौकशी केली. 

आरोपपत्रात कोणाचे नाव?दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणी सुरू असताना, या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची माहिती न्यायालयाला मिळाली. ईडीने पहिल्या आरोपपत्रात राबडी यादव, हेमा यादव, मिसा भारती, अमित कात्याली, हृदयानंद चौधरी आणि इतर काही जणांची नावे समाविष्ट केली आहेत. ईडी हे प्रकरण कसे पुढे नेते, हे लालू कुटुंबाच्या विशेषतः तेजस्वी यादव यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

काय आहे लँड फॉर जॉब प्रकरण?लँड फॉर जॉब प्रकरण लालू प्रसाद यादव हे रेल्वे मंत्री असतानाच्या कार्यकाळातील संबंधित आहे. त्यावेळी रेल्वेच्या विविध विभागांमध्ये ग्रुप डी पदांसाठी भरती होती. आरोपानुसार, याच काळात लालू यादव यांनी नियुक्त तरुणांच्या कुटुंबीयांकडून लाखो रुपयांची जमीन कवडीमोल भावाने खरेदी केली होती. ही बाब २००४ ते २००९ मधील आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर, सीबीआयने १८ मे २०२२ रोजी लालू यादव, राबडी देवी, मीसा भारती आणि तेजस्वी यादव यांच्यासह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय