भू-संपादन अध्यादेश; स्वदेशी जागरणचा विरोध
By Admin | Updated: January 14, 2015 00:34 IST2015-01-14T00:34:48+5:302015-01-14T00:34:48+5:30
रा. स्व. संघाची आर्थिक शाखा असलेल्या स्वदेशी जागरण मंचाने भू-संपादन अध्यादेशाला विरोध दर्शविला आहे.

भू-संपादन अध्यादेश; स्वदेशी जागरणचा विरोध
नवी दिल्ली : रा. स्व. संघाची आर्थिक शाखा असलेल्या स्वदेशी जागरण मंचाने भू-संपादन अध्यादेशाला विरोध दर्शविला आहे. नरेंद्र मोदी सरकारकडे शेतकऱ्यांचे हित पाहून दुरुस्ती करावी असा आग्रह जागरण मंचाने केला आहे.
या अध्यादेशातील सामाजिक प्रभावाचे मूल्यांकन व अन्नसुरक्षेच्या उपायांबाबतच्या तरतुदी हटविण्याला मंचाचा विरोध आहे. या भू-संपादन कायद्यात अंतर्भूत असलेल्या बाबी असून त्या संपुआ सरकारच्या कार्यकाळात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. मंचाच्या राष्ट्रीय सह संयोजक अश्विनी महाजन यांनी सरकार यात दुरुस्ती करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सामाजिक प्रभावाचे मूल्यांकन हा जगातील कुठल्याही भू-संपादन योजनेचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)