पोलवर स्वखर्चाने बसविले पथदीपांवर दिवे
By Admin | Updated: January 11, 2015 00:54 IST2015-01-11T00:17:25+5:302015-01-11T00:54:51+5:30
पंचवटी : दिंडोरीरोडवरील तारवालानगर भागातील मुख्य रस्त्यावरच्या बंद पथदीपांबाबत वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने परिसरातील नागरीकांनी स्वखर्चातून पथदीपांवर दिवे बसविले आहेत.

पोलवर स्वखर्चाने बसविले पथदीपांवर दिवे
पंचवटी : दिंडोरीरोडवरील तारवालानगर भागातील मुख्य रस्त्यावरच्या बंद पथदीपांबाबत वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने परिसरातील नागरीकांनी स्वखर्चातून पथदीपांवर दिवे बसविले आहेत.
परिसरात नागरी वसाहत मोठी असुन नागरीकांची कायम वर्दळ असते त्यातच पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरते. परिसरातील बंद पथदीपांबाबत मनपाच्या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने तारवालानगर भागातील रहिवासी महेंद्र बडवे तसेच अन्य नागरीकांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने बंद पथदीपांवर दिवे लावले आहेत. प्रशासनाने या पुढे दखल न घेतल्यास परिसरातील अन्य भागातील बंद पथदीपांवर देखिल स्वखर्चाने दिवे बसवून गांधीगिरीने आंदोलन करणार असल्याचे बडवे यांनी सांगितले. (वार्ताहर)
एनएसके इडीटवर फोटो टाकला आहे.