लालू यादव यांच्या प्रकृतीत बिघाड; उठता-बसता येईना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 00:54 IST2018-11-18T00:53:12+5:302018-11-18T00:54:22+5:30
चारा घोटाळ्यात शिक्षा अटक झालेले यादव रांचीच्या रुग्णालयात मधुमेह व मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार घेत आहेत.

लालू यादव यांच्या प्रकृतीत बिघाड; उठता-बसता येईना
रांची : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना बसता वा उभेही राहता येत नाही. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही खूप वाढले असून, त्यांना मोठ्या रुग्णालयात उपचारांसाठी नेणे आवश्यक आहे, असे पक्षाच्या आ. रेखा यादव म्हणाल्या. लालू यादव ७0 वर्षांचे आहेत.
चारा घोटाळ्यात शिक्षा अटक झालेले यादव रांचीच्या रुग्णालयात मधुमेह व मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार घेत आहेत. मुलगा तेजप्रताप यांच्या घटस्फोटाच्या वृत्तामुळे ते अतिशय अस्वस्थ असून, तणावामुळे ते रात्री झोपूही शकत नाहीत, असे रेखा यादव म्हणाल्या. (वृत्तसंस्था)