लालूप्रसाद यादव निराशेच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 06:50 IST2018-09-09T06:50:10+5:302018-09-09T06:50:25+5:30

चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राजदचे नेते लालूप्रसाद यादव डिप्रेशनमध्ये (नैराश्य) गेले आहेत.

Lalu Prasad Yadav is in despair | लालूप्रसाद यादव निराशेच्या गर्तेत

लालूप्रसाद यादव निराशेच्या गर्तेत

रांची : चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राजदचे नेते लालूप्रसाद यादव डिप्रेशनमध्ये (नैराश्य) गेले आहेत. अनेकदा आजारपण व वातावरणातील बदलामुळे नैराश्य येऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. त्यांच्या पायावर सूज आहे. चालताना त्यांना त्रास होत आहे. त्यातच डिप्रेशनची समस्याही पुढे आली आहे. उच्च रक्तदाबही आहे. मात्र, त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्याची गरज नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Lalu Prasad Yadav is in despair