लालूंचा डबस्मॅश, मिमिक्री करत उडवली मोदींची खिल्ली

By Admin | Updated: October 5, 2015 14:10 IST2015-10-05T14:10:59+5:302015-10-05T14:10:59+5:30

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी त्यांचा पहिलावहिला डबस्मॅश व्हिडीओ तयार केला असून या व्हिडीओत त्यांनी मोदींची मिमिक्री केली आहे.

Laloo's dubbing, mimicry blamed Modi | लालूंचा डबस्मॅश, मिमिक्री करत उडवली मोदींची खिल्ली

लालूंचा डबस्मॅश, मिमिक्री करत उडवली मोदींची खिल्ली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ५ - सोशल मिडीयावर सक्रीय असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यासाठी आता विरोधकांनीही सोशल मिडीयाचाच आधार घेतला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी त्यांचा पहिलावहिला डबस्मॅश व्हिडीओ तयार केला असून या व्हिडीओत त्यांनी मोदींची मिमिक्री केली आहे. 

डबस्मॅश हे तरुणाईमध्ये चांगलेच लोकप्रिय असून आता लालूप्रसाद यादव यांनीही डबस्मॅशवर पदार्पण केले आहे. पहिल्याच व्हिडीओत लालूप्रसाद यांनी मोदींची नक्कल केली आहे. 'मेरे प्यारे भाईयो औऱ बहनो, अच्छे दिन आनेवाले है, भारतातील प्रत्येक गरीबाला फुकट १० ते १५ लाख रुपये मिळतील' या मोदींच्या आश्वासनावर लालूंनी त्यांचा डबस्मॅश व्हिडीओ तयार केला आहे. लालूप्रसाद यांचा हा डबस्मॅश व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच गाजत आहे. 

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयाचा सुनियोजित आणि प्रभावीपद्धतीने वापर केला होता. आता बिहार निवडणुकीत लालूप्रसाद यांनी थेट डबस्मॅशचा आधार घेत टेक्नोसेव्ही मोदींना टक्कर दिल्याचे दिसते.  

Web Title: Laloo's dubbing, mimicry blamed Modi