ललिता कुमारमंगलम राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा
By Admin | Updated: September 18, 2014 02:53 IST2014-09-18T02:53:42+5:302014-09-18T02:53:42+5:30
केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या विरोधाला न जुमानता भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ललिता कुमारमंगलम यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.

ललिता कुमारमंगलम राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा
नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय नियुक्तीला केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या विरोधाला न जुमानता भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ललिता कुमारमंगलम यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीची घोषणा होताच मनेका यांनी विरोध म्यान केला आहे.
ललिता या तामिळनाडूतील राजकारणात स्वातंत्र्यपूर्व काळापासून राजकारणात सक्रिय असलेल्या प्रख्यात कुमारमंगलम कुटुंबातील आहेत. काँग्रेस नेते मोहन कुमारमंगल यांच्या त्या कन्या तसेच नरसिंह राव आणि वाजपेयी सरकारमधील मंत्री दिवंगत आर. कुमारमंगलम यांच्या भगिनी होत. ललिता यांच्या नियुक्तीचा निर्णय सरकार आणि पंतप्रधानांचा असल्याचे सांगत महिला आयोगाचे अधिकार वाढविण्याचा प्रस्ताव आहे, असे मनेका गांधी म्हणाल्या. या प्रस्तावाला
विधी मंत्रलयाच्या मान्यतेची प्रतीक्षा
आहे. या विलंबाचे काय कारण असावे, याबद्दल गांधी यांनी काहीही सांगितले
नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)