ललित मोदी- प्रत्यार्पण..

By Admin | Updated: March 2, 2016 02:21 IST2016-03-02T02:21:44+5:302016-03-02T02:21:44+5:30

ललित मोदी- प्रत्यार्पण..१ मार्च २०१६ललित मोदींच्या प्रत्यार्पणासाठी ईडीला परवानगीमुंबई : विशेष न्यायालयाने अमलबजावणी संचानालयाला (ईडी) आयपीएलचे माजी चेअरमन ललित ...

Lalit Modi- The Reciprocity .. | ललित मोदी- प्रत्यार्पण..

ललित मोदी- प्रत्यार्पण..

>ललित मोदी- प्रत्यार्पण..१ मार्च २०१६

ललित मोदींच्या प्रत्यार्पणासाठी ईडीला परवानगी
मुंबई : विशेष न्यायालयाने अमलबजावणी संचानालयाला (ईडी) आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्याविरुद्ध प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मनी लॉड्रींगप्रकरणी ईडी मोदी आणि अन्य लोकांची चौकशी करीत आहे. ललित मोदी यांच्या प्रत्यार्पणासंदर्भात आम्ही कार्यवाही सुरु केली असून या प्रक्रियेला गती देण्यासाठी आम्ही लवकरच यासंदर्भात विदेश मंत्रालयाला विनंती करणार आहोत, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. विदेश मंत्रालयामार्फतप्रत्यार्पणासंबंधीचे विनंतीपत्र ब्रिटनमधील विशेष न्यायालयाकडे पाठविले जाईल.
ललित मोदींचे वास्तव्य ब्रिटनमध्ये असल्याचा ईडीचा दावा आहे. ५ ऑगस्ट २०१५ रोजी विशेष न्यायालयाने ललित मोदींविरुद्ध अजामिनपात्र वॉरन्ट जारी केले होते. त्या आधारे ईडीने इंटरपोलकडे रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी धाव घेतली होती.

Web Title: Lalit Modi- The Reciprocity ..