शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

लाेकमत विशेष मुलाखत : उज्ज्वल विकासाचे रोल मॉडेल गावागावात; राजीव पोद्दार यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 00:48 IST

लाेकमत विशेष मुलाखत : बाळकृष्ण इंडस्ट्रीजचे सहव्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार यांचे मत

स्कूटरसाठी टायर बनवणारी  कंपनी एकदम कृषी आणि इतर  क्षेत्रांसाठी लागणाऱ्या वाहनांचे  टायर बनवू लागली. हा बदल कसा झाला? 

आमची सुरूवात औरंगाबादपासून झाली. तिथे आम्ही स्कूटरसाठी टायर बनवायला सुरुवात केली. नंतर आम्ही जीपसाठीही टायर बनविले. पण हे सारे सामान्य होते. आम्ही विचार केला की काय वेगळे करता येईल ज्यात आपण विस्तार करू शकू. जगात नंबर होऊ शकू. त्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळे करण्याची गरज होती. आम्ही विचार केला की जगात मागणी काय आहे? युरोपात आणि इतर देशांमध्ये सध्या स्पर्धक काय करत आहेत? हेही पाहिले. मग आम्ही कृषी क्षेत्रापासून सुरुवात केली. इथे प्रचंड वृद्धीची संधी होती. मग आम्ही लोकांना एक उत्तम दर्जाच्या स्वस्तात मिळणाऱ्या टायरचा पर्याय उपलब्ध करून दिला. याची सुरुवातच आम्ही युरोपातील बाजारातून केली. त्यावेळी आमचे स्पर्धकही युरोपीयच होते. आजही आमची स्पर्धा ही केवळ भारतीय कंपन्यांशी नाही, परदेशातील बड्या कंपन्यांच्या स्पर्धेत आम्ही आहोत. कारण दर्जेदार टायर देऊ लागलो. त्यामुळे काही ठिकाणी काही विभागात आम्ही जगातही नंबर वन आहोत. 

एक प्रकारे बीकेटी आत्मनिर्भर  भारतला हातभारच लावत आहे. ‘आत्मनिर्भर भारत’सारखेच आम्ही आधीपासून काम करत आहोत. मायनिंग क्षेत्रासाठी लागणारे मोठमोठे टायर बनवण्याची क्षमता भारतात फक्त बीकेटीकडे आहे. अडीच टनचा टायर भारतात बीकेटीशिवाय कोणीच बनवत नाही. एकेकाळी भारताला हे टायर्स आयात करत होतो. आता ते भारतीयांना आयात करावे लागत नाही. बीकेटीचा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यात आपण आत्मनिर्भर आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. लॉकडाउन काळातही आपण 

एक विक्रम केला, तो कसा?ऑल स्टील रेडियल टायरमधील पूर्ण प्रकारात आम्ही असावे, असं आमचं मत होते. त्यामुळे २५ इंच टायरपासून सुरुवात केली. त्यानंतर आम्ही, २९ इंची, ३३इंची सुरुवात करून ४९ आणि ५१ इंची टायरही बनवले. पण भारतात ४००/५७ इंची टायर आयात करत होता. हे बनवण्यासाठी मशिन इन्स्टॉल करण्याची गरज होती. मशिन परदेशातून आली होती. पण कोरोनाकाळात परदेशातून तंत्रज्ञ येऊ शकत नव्हते. त्यामुळे बीकेटीमधील तज्ञांनीच ते काम मोठ्या कौशल्याने केले. मशिन इन्स्टॉल केली. ती चालवली व टायरची निर्मितीही करून दाखवली. टायरची टेस्टिंगही करायला दिले. यातून हेही सिद्ध झाले की भारतात क्षमता आहे, कौशल्य आहे. फक्त त्याचा योग्य वापर होत नाही. 

असे भले मोठे टायर निर्यात  करण्याचा विचार आहे का? या टायर्सची जगभरात मागणी आहे. मात्र, सध्या तरी बीकेटी ते फक्त भारतासाठी तयार करत आहे. आम्ही भारतातील मागणीला प्राधान्य देतोय. आमची इच्छा आहे की ऑफ  द हायवे वाहनांसाठी लागणाऱ्या टायरच्या निर्मितीत भारत आत्मनिर्भर व्हावा. 

बीकेटीची इतरही उत्पादने आपण  निर्यात करत आहात का? आमची ८० टक्के उलाढाल ही निर्यातीवर आधारित आहे. पाच वर्षांपूर्वी आमची उलाढाल जवळपास २००० कोटींची होती. आता तो ४ हजारांच्याही पुढे गेला आहे. आपण जर जागतिक पातळीवर विचार केला तर कृषी क्षेत्रासाठी लागणाऱ्या टायरच्या फ्रान्समध्ये आम्ही नंबर वन आहोत. जर्मनीमध्ये तेथील कंपन्यांपेक्षाही आमच्या टायर्सना अधिक मागणी आहे. तेथे आमचा बाजारातील हिस्सा सर्वाधिक आहे. 

जागतिक पातळीवरील विविध  स्पर्धांमध्ये बीकेटी प्रायोजक  असते, त्यामागे उद्देश काय?आम्ही युरोपात ला लिगा, लीग टू, इटलीमध्ये सेरी बीकेटी या फुटबॉल स्पर्धांना आम्ही प्रायोजक आहोत. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश क्रिकेट स्पर्धा, भारतात आयपीएलमध्ये गेल्या वर्षी सहा संघांना प्रायोजक होतो. यंदा त्याहीपेक्षा अधिक संघांसाठी प्रायोजक असू. तामिळनाडू प्रिमीयर लीग, कबड्डीसाठीही आम्ही प्रायोजकत्व स्वीकारले आहे. भारतात फुटबॉलला पूर्वेकडे मोठी मागणी आहे. तेथेही आम्ही प्रायोजक राहिले आहोत. 

स्पोर्ट्सला प्रायोजकत्व देण्यामागे  काय उद्देश?ज्यावेळी एखादी व्यक्ती मनोरंजनासाठी स्पर्धा पाहत असतो, त्यावेळी त्याच्या मनात फार कामाच्या गोष्टी नसतात. पण, त्याच्या मनावर त्याला व्यत्यय न येऊ देता ब्रँड बिंबवता येतो. त्याच्या मोकळ्या वेळात आपल्या ग्राहकाशी नातं जोडता यावं यासाठी हा प्रयत्न असतो. 

लोकमत सरपंच पुरस्कारालाही आपण प्रायोजक आहात, याबद्दल  काय सांगाल?लोकमत सरपंच पुरस्कारामध्ये आम्ही गेल्या दोन वर्षांपासून सोबत आहोत. सरपंच ही व्यक्ति सन्माननीय असते. कारण महाराष्ट्रात असे अनेक सरपंच आहेत जे उत्तम काम करत आहेत, आपल्या गावाचा विकास करत आहेत. अनेकांसाठी ते रोल मॉडेल आहेत. त्यांचा सन्मान हा खरे तर गावातील प्रत्येकाचा सन्मान असतो. गावातले शेतकरी त्यांच्याकडे आशेने पाहात असतात. या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेकांना प्रतीक्षा असते. 

टायर क्षेत्र कामगिरी कशी असेल?शेतकरी अधिकाधिक ट्रॅक्टर खरेदी करू लागले आहेत. इतर क्षेत्रातही चांगली मागणी आहे. त्यामुळे टायरची मागणीही वाढेल. गेल्या काही तिमाहीत तुमची  कामगिरी चागली राहिली आहे. 

येत्या काळातही अशीच वृद्धी काय  राहील असे वाटते का?दीर्घ काळाचा विचार केला तर वृद्धी चांगली राहणार आहे. कारण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था वाढू लागली आहे. त्यामुळे तेथे वाहनांची मागणी वाढणार आहे. येणारा काळ आणखी आशादायी आहे. 

टॅग्स :Lokmatलोकमत