शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur kheri Violence: लखीमपूर हिंसाचार; गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 18:50 IST

Lakhimpur kheri Violence: लखीमपूर खेरी हिंसाचाराला आज 90 दिवस पूर्ण झाले आहेत. याप्रकरणी एसआयटीने न्यायालयात 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

लखीमपूर: लखीमपूर खेरी हिंसाचाराला आज 90 दिवस पूर्ण झाले आहेत. याप्रकरणी एसआयटीने (SIT) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र 5 हजार पानांचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनीसह नातेवाईक वीरेंद्र कुमार शुक्लाचे नावही जोडले गेले आहे. वीरेंद्र कुमार शुक्ला यांच्यावर कलम 201 अंतर्गत पुरावे नष्ट करण्याचे आरोप आहेत.

न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांच्या वकिलांनी सांगितले की, आरोपपत्रात मंत्री अजय मिश्रा यांचे नाव जोडण्यासाठी अर्ज करण्यात आला होता, मात्र त्यांचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या निदर्शनादरम्यान गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी याने शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप आहे. त्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाला होता. विशेष तपास पथकाचे हजारो पानांचे आरोपपत्र आज सकाळी लखीमपूर खेरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पोहोचले. 

आशिष मिश्रा जामिनावर 6 जानेवारीला सुनावणी3 ऑक्टोबर रोजी लखीमपूरच्या तुकानिया येथे एका पत्रकारासह 8 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेश एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रासह 13 जण न्यायालयीन कोठडीत आहेत. आशिष मिश्राच्या जामीन अर्जावर 6 जानेवारीला सुनावणी होणार आहे.

कलम वाढविण्याची माहिती शेतकऱ्यांच्या वकिलांनी दिली

हिंसाचार प्रकरणात शेतकऱ्यांचे वकील अमन म्हणाले की, एफआयआरमध्ये कलम 201 वाढवण्यात आले आहे. तसेच वीरेंद्र कुमार शुक्ला यांचे नाव जोडले गेले आहे. मंत्र्याचे नावही जोडण्याची विनंती केली होती, मात्र त्यांचे नाव जोडले गेले नाही. दरम्यान, एसआयटीच्या इन्स्पेक्टर विद्या राम दिवाकर यांनी हा अपघात नसून सुनियोजित कट असल्याचे म्हटले होते. 

आशिष मिश्रावर या कलमांतर्गत गुन्हे दाखलगृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि सहकारी नंदन सिंगवर कलम 177(मोटार वाहन कायदा) आणि 5/25 (आर्म्स अॅक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आरोपपत्र आरोपींना दाखवण्यात आलेले नाही. कोर्टाने आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर कलम 309 अन्वये सर्व आरोपींना कोर्टात बोलावून आरोपपत्राची प्रत दिली जाईल.

हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू 

लखीमपूर येथे 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या घटनेत चार शेतकरी, स्थानिक पत्रकार यांच्यासह आठ जणांचा मृत्यू झाला होता. आशिष मिश्रा आणि त्यांच्या साथीदारांवर गोळीबार करताना शेतकऱ्यांना त्यांच्या गाडीने तुडवल्याचा आरोप आहे. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले. 4 ऑक्टोबर रोजी टिकुनिया पोलीस ठाण्यात आशिष मिश्रा आणि इतर अनेकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यानंतर एसआयटीच्या तपासात हा अपघात नसून सुनियोजित कटातून केलेला खून असल्याचे उघड झाले. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारFarmer strikeशेतकरी संपCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी