शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्र्यांना ओडिशात तीव्र विरोध; काँग्रेसने काळे झेंडे दाखवले, गाडीवर अंडीही फेकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 19:57 IST

भुवनेश्वरमधील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा ताफा बाहेर पडताच काँग्रेस कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन रस्त्यावर आले.

भुवनेश्वर: काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना चिरडल्याच्या प्रकरणांपासून चर्चेत आलेले केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा रविवारी ओडिशात पोहोचले असता, त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. ओडिशात दाखल झालेले गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना विमानतळाबाहेर येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांच्या गाडीवर अंडीही फेकली.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रविवारी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे पोहोचले होते. अजय मिश्रा टेनी यांचा ताफा भुवनेश्वरच्या बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर पडताच काँग्रेस कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन रस्त्यावर आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अजय मिश्रा यांना काळे झेंडे तर दाखवलेच, पण त्यांच्या गाडीवर अंडीही फेकली. 3 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना चिरडल्याचे प्रकरण झाले, त्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी अजय मिश्रा टेनी यांचा जोरदार विरोध केला.

लखीमपूर खेरीत काय घटलं ?3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे कथितरित्या अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने चार शेतकर्‍यांना चिरडल्याची घटना घडली. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात एका पत्रकारासह आणखी चार जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर बऱ्याच दिवस बेपत्ता राहिल्यानंतर त्याने पोलिसांना आत्मसमर्पण केले. त्या घटनेच्या विरोधात देशभरात शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी आंदोलने केली. तसेच, अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणीही शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षाकडून करण्यात आली.

टॅग्स :OdishaओदिशाBJPभाजपाLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारcongressकाँग्रेस