शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्र्याचा मुलगा आशिष मिश्रा आत्मसमर्पण कधी करणार? समोर आली मोठी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 15:35 IST

Lakhimpur Violence: केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला गुन्हे शाखेने शुक्रवारी सकाळी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते.

लखीमपूर खेरी: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला गुन्हे शाखेने शुक्रवारी सकाळी कार्यालयात येण्यास सांगितले होते. पण, अजूनपर्यंत आशिष मिश्रा किंवा त्यांचे वकीलही गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झालेले नाहीत. 

रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आशिषला शुक्रवारी सकाळी 10 वाजता गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल होण्यास सांगितले होते. यासंदर्भातील नोटीसही त्याच्या निवासस्थानाबाहेर चिकटवण्यात आली. तसेच, या प्रकरणाच्या तपास पथकाचे नेतृत्व करणारे पोलिस उपमहानिरीक्षक उपेंद्र अग्रवालही वेळेवर कार्यालयात पोहोचले. पण, आशिष कार्यालयात आलाच नाही.

उद्या पोलिसांना शरण येण्याची शक्यतासूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा रात्री उशिरापर्यंत लखीमपूर खेरीला पोहोचतील आणि त्यानंतर ते उद्या पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलाला सादर करतील. त्यामुळे आशिष मिश्रा उद्या म्हणजेच शनिवारी पोलिसांसमोर हजर होऊ शकतात. दरम्यान, आशिष मिश्रा नेपाळला पळून गेल्याच्या काही बातम्या सकाळी माध्यमांमध्ये दाखवण्यात आल्या होत्या, पण याची अधिकृतपणे अद्याप पुष्टी झालेली नाही.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारCrime Newsगुन्हेगारी