श्रमसंस्कृती जगाचा उद्धार करते : भाई वैद्य
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:41+5:302015-03-14T23:45:41+5:30
पुणे : श्रमसंस्कृती ही जगाचा उद्धार करते. जे जे देश श्रम संस्कृतीचा अंगीकार करणारे होते, त्यांचा विकास झाला. भारतात मात्र वर्ण संस्कृतीचा आजही अभिमान बाळगला जातो, जो विकास आणि सामाजिक समतेपासून आपल्याला दूर करीत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी केले.

श्रमसंस्कृती जगाचा उद्धार करते : भाई वैद्य
प णे : श्रमसंस्कृती ही जगाचा उद्धार करते. जे जे देश श्रम संस्कृतीचा अंगीकार करणारे होते, त्यांचा विकास झाला. भारतात मात्र वर्ण संस्कृतीचा आजही अभिमान बाळगला जातो, जो विकास आणि सामाजिक समतेपासून आपल्याला दूर करीत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी केले. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने समाजभूषण उत्तमराव पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी परिषदेच्या संयुक्त चिटणीस प्रमिला गायकवाड, संदिप कदम, खजिनदार विजयसिंह जेधे, नियामक मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे, पुणे विभागीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, के.टी सोनावणे, सुधाकर पन्हाळे, रणजित चव्हाण, भागवतराव गायकवाड उपस्थित होते. समाजभूषण उत्तमराव पाटील यांनी श्रम संस्कृती जपली. ती कोण्या एका वर्णाची नसून प्रत्येकाचीच आहे. आपले कोणतेही काम असो ते निष्ठेने करण्याचा मंत्र पाटील यांनी दिल्यामुळेच ते संस्थेला विकसित करू शकले, असे सांगून त्यांच्या विविध आठवणी भाई वैद्य यांनी उजाळा दिला. समाजकारणातील तळमळ,राजकारणातील परखडपणा तसेच सामान्य माणसांबद्दल प्रेम या पाटील यांच्या गुणांचे त्यांनी वर्णन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब इंगवले यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले व गंगाधर घारे यांनी आभार मानले. --------------------------------------------------------------------------------------------------------