शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

'जय श्रीराम'च्या घोषणेनं त्रास होतो, मग 'हे' कसं चालतं?; 'तो' व्हिडीओ पोस्ट करत भाजपचा ममता बॅनर्जींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 15:42 IST

कोलकात्यातील कार्यक्रमादरम्यान जय श्रीरामच्या घोषणेनंतर ममता बॅनर्जींनी व्यक्त केला होता संताप

ठळक मुद्देकार्यक्रमादरम्यान जय श्रीरामच्या घोषणेनंतर ममता बॅनर्जींनी व्यक्त केला होता संतापव्हिडीओ शेअर करत भाजपानं केला ममता बॅनर्जींना सवाल

कोलकात्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्रीममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. तसंच त्यांनी ही गर्दी एका खास पक्षाची असल्याचा आरोप भाजपावर केला होता. कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणाबाजीला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध दर्शविला. यावरूनच भाजपंनं ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.भाजप बंगालनं रविवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. "जर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पश्चिम बंगाल सरकारच्या एका कार्यक्रमात इस्लामिक प्रार्थना करू शकतात. तर त्यांना जय श्रीराम बोलण्यात काय त्रास होतो? तुष्टीकरण? त्यांनी पश्चिम बंगालला बदनाम केलं आहे आणि नेताजींच्या जयंतीच्यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात आपल्या आचरणानं त्यांनी नेताजींच्या वारशाचा अवमान केला आहे," असं भाजपनं म्हटलं आहे.  या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी या इस्लामिक प्रार्थना करताना दिसत आहेत. दरम्यान, या व्हिडीओ केव्हाचा आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी ला इलाहा इल्लल्लाह…असं म्हणताना दिसत आहेत. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महासचिव डॉ. सुरेंद्र जैन यांनीदेखील ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. "जय श्रीराम म्हमताना केवळ रावणाला अपमानित झाल्यासारखं वाटायचं. आता सेक्युलर माफियांना अपमानित झाल्यासारखं वाटतं. हरण्याची भीती एवढं हताश करते? राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार प्रभू श्रीराम हे आपल्या देशाचा आत्मा आहेत. ज्यांचं नाव जपल्यानंतर देशाला अभिमान वाटतो," असं ते म्हणाले. हे वळूला लाल कपडा दाखवल्यासारखंभाजपचे नेते आणि हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे. "ममता बॅनर्जी यांच्यासाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कपडा दाखवण्यासारखं आहे. याच कारणामुळे त्यांनी व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आपलं भाषण थांबवलं" असं विज यांनी म्हटलं. अनिल विज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मला वाटते की, सरकारच्या कार्यक्रमात काही मोठेपण असले पाहिजे. हा राजकीय कार्यक्रम नाही. एखाद्याला आमंत्रण केल्यानंतर अपमान करणे आपल्याला शोभा देत नाही," असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीChief Ministerमुख्यमंत्रीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारMuslimमुस्लीमBJPभाजपा