कुजबूजू : सुशांत कुंकळयेकर
By Admin | Updated: July 31, 2015 00:22 IST2015-07-31T00:22:48+5:302015-07-31T00:22:48+5:30
‘ईद का चांद..’

कुजबूजू : सुशांत कुंकळयेकर
‘ द का चांद..’ईद दिवशी उगवणार्या चंद्राला महत्त्व असते; कारण चंद्रदर्शनानंतरच ईदला सुरुवात होत असते. त्यामुळे या दिवशी अनेकजण हा चांद कधी उगवतो याची वाट पाहात असतात. हा ‘ईद का चांद’ वर्षातून एकदाच उगवत असल्याने त्याचे औत्सुक्य कायम असते. मात्र, ‘ईद का चांद’ असा एक वाक्प्रचारही प्रचलित आहे. कधीतरी अभावानेच भेटणार्याला ‘ईद का चांद’ असे हिणवले जाते. सध्या मडगावचे मुख्याधिकारी यशवंत तावडे यांनाही काही नगरसेवक ही उपमा देत आहेत. वास्तविक तावडे मनमिळावू अधिकारी आहेत. त्यामुळेच नवीन लक्ष्मण यांची बदली करून नगरसेवकांनी तावडेंना पालिकेत आणले. मात्र, आता हे तावडेच नगरसेवकांना मिळेनासे झाले आहेत. यात तावडेंची काही चूक नाही. त्यांच्याकडे तीन महत्त्वाच्या कामांचा ताबा आहे. त्यामुळे ते पुरेसा वेळ पालिकेला देऊ शकत नाहीत. त्यात नगरसेवकांविरुध्द स्थानिकांच्या तक्रारी वाढू लागल्यामुळे तावडे म्हणे या नगरसेवकांपासून दोन हात दूरच राहू पाहातात. नागरिकांच्या तक्रारींमुळेच त्यांनी कामांची निविदा प्रक्रियाही थोपवून धरली. कदाचित ते म्हणत असावेत, या नगरमंडळाचा अवधी संपायला केवळ तीन महिने बाकी आहेत. अशावेळी मडगावच्या नागरिकांशी आपण का पंगा घ्यावा? तसे तावडे यांना धूर्त अधिकारी म्हणूनही ओळखतात.एक्स्टेन्शनला कारागिरांचा आधारमराठीत एक म्हण आहे, ‘बुडत्याला काडीचा आधार.’ मात्र, गोवा हस्तकला महामंडळात ही म्हण बदलून ‘सेवावाढीला कारागिरांचा आधार’ ही नवी म्हण प्रचलित होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. याचे कारण म्हणजे या महामंडळातील एका सरव्यवस्थापकाला लागलेले एक्स्टेन्शन म्हणजेच सेवावाढीचे वेध. मिळालेल्या माहितीप्रमाणे हा व्यवस्थापक म्हणे येत्या ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होणार आहे. निवृत्तीनंतर आपल्याला सेवावाढ मिळावी यासाठी त्यांनी उद्योगमंत्र्यांसह सर्व हितसंबंधीयांचे उंबरठे झिजवले तरीही म्हणे त्यांना सेवावाढ देण्याचे कुणी मनावर घेतले नाही. त्यामुळे आता त्यांनी नवीनच शक्कल लढविली आहे. हस्तकला महामंडळाशी संलग्नित काही कारागिरांना बोलावून आपल्याला सेवावाढ मिळावी, अशा आशयाच्या निवेदनावर स?ा घेऊन त्यांनी हे निवेदन आता उद्योगमंत्र्यांना व इतरांना पाठवून दिले आहे. आता आपल्या सेवावाढीसाठी कारागिरांचा आधार घेणार्या या व्यवस्थापकाने आपल्या कार्यकाळात मात्र एकही कारागीर पुढे यावा यासाठी विशेष प्रयत्न केले नव्हते हे विशेष.