आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये अत्यंत खळबळजनक घटना घडली. आपल्या एक्स बॉयफ्रेन्डने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा राग मनात धरून, एका महिलेने चक्क त्याच्या डॉक्टर पत्नीला एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्ताचे इंजेक्शन दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेसह एका नर्सला आणि तिच्या दोन मुलांना अटक केली आहे.
पीडित महिला कुरनूलमधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. ९ जानेवारी रोजी दुपारी २:३० च्या सुमारास ती आपल्या स्कूटरवरून घरी परतत असताना, विनायक घाट परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी मुद्दाम तिच्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात डॉक्टर महिला जखमी होऊन खाली पडली. त्याच वेळी, मुख्य आरोपी बी. बोया वसुंधरा (वय, ३४) हिने मदतीचा बहाणा करत तिथे धाव घेतली. पीडितेला रिक्षात बसवत असताना, वसुंधरा गुपचूप तिला एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्ताचे इंजेक्शन टोचले. पीडितेने वेदनेने ओरडताच सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, वसुंधरा ही पीडितेच्या पतीची एक्स गर्लफ्रेन्ड होती. आपल्या प्रियकराने दुसऱ्याशी लग्न केल्याचे ती सहन करू शकली नाही आणि त्यांना वेगळे करण्यासाठी तिने हा कट रचला. या कटात तिला कोंग ज्योती नावाच्या एका परिचारिकेने साथ दिली. या नर्सने सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून संशोधनाचे कारण सांगून एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्ताचे नमुने गोळा केले. हे संक्रमित रक्त काही दिवस रेफ्रिजरेटरमध्ये साठवून ठेवण्यात आले होते, जे नंतर अपघाताचे नाटक करून पीडितेच्या शरीरात इंजेक्शनद्वारे सोडण्यात आले.
पीडितेचे पती, जे स्वतः डॉक्टर आहेत, त्यांनी १० जानेवारी रोजी कुरनूल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे २४ जानेवारी रोजी चारही आरोपींना अटक केली. यामध्ये वसुंधरा, नर्स ज्योती आणि तिची दोन मुलांचा समावेश आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम १२६(२), ११८(१), २७२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.
Web Summary : In Kurnool, Andhra Pradesh, a woman injected her ex-boyfriend's wife, a doctor, with HIV-positive blood out of jealousy. An accomplice nurse and her two children were also arrested. The victim was attacked while returning home. Police are investigating the disturbing crime.
Web Summary : आंध्र प्रदेश के कुरनूल में एक महिला ने ईर्ष्या में अपने पूर्व प्रेमी की पत्नी, जो कि एक डॉक्टर है, को एचआईवी पॉजिटिव खून का इंजेक्शन लगा दिया। एक नर्स और उसके दो बच्चों को भी गिरफ्तार किया गया है। पीड़िता पर घर लौटते समय हमला किया गया। पुलिस मामले की जांच कर रही है।