"कुणाल कामरा देशप्रेमी, त्याचा उद्देश..."; एकनाथ शिंदेंबद्दल गाणे, प्रशांत किशोर काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:06 IST2025-03-31T15:05:32+5:302025-03-31T15:06:20+5:30

Kunal Kamra Controversy: एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कुणाल कामराने विडंबन गाणे तयार केले. त्यामुळे वाद उभा राहिला. त्यावर आता प्रशांत किशोर यांनी भाष्य केले.

"Kunal Kamra is a patriot, his intentions were not wrong"; What did Prashant Kishor say about singing about Eknath Shinde? | "कुणाल कामरा देशप्रेमी, त्याचा उद्देश..."; एकनाथ शिंदेंबद्दल गाणे, प्रशांत किशोर काय बोलले?

"कुणाल कामरा देशप्रेमी, त्याचा उद्देश..."; एकनाथ शिंदेंबद्दल गाणे, प्रशांत किशोर काय बोलले?

Prashant kishor kunal kamra: राजकीय वादात सापडलेल्या स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराचे पूर्वीचे राजकीय रणनीतिकार आणि जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी समर्थन केले आहे. "कुणाल कामरा याला देशाबद्दल प्रेम आहे. तो माझ्या मित्र आहे. त्यांच्याकडून शब्द निवडण्यात चूक झाली असेल", असे भूमिका प्रशांत किशोर यांनी मांडली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कुणाल कामरा याने 'ठाणे कि रिक्षा' असे विडंबन गाणे तयार केले. हे गाणे राजकीय वादात सापडले. कुणाल कामराविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी कुणाल कामराचे समर्थन केले. 

प्रशांत किशोर कुणाल कामराबद्दल काय बोलले?

प्रशांत किशोर कुणाल कामराबद्दल बोलताना म्हणाले, "तो माझा चांगला मित्र आहे आणि कुणालने काही अशा गोष्टी म्हटल्या ज्यामुळे वाद झाला. पण, कुणाल कामराचा कोणताही चुकीचा उद्देश नव्हता. तो सेंद्रिय शेती करतो आणि सोबत स्टॅण्डअप कॉमेडी करतो."

हेही वाचा >>तमिलनाडू कैसे पोचनेका? कुणाल कामरा प्रकरण अन् महाराष्ट्रातील राजकारण

"त्याचे कोणतेही राजकीय वैर नाहीये. होऊ शकते की त्याने चुकीचे शब्द निवडले. त्याने जर असं केलं असेल, तर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. पण, मी हे सांगेन की, तो देशाचा आणि संविधानाचा आदर करतो", अशी भूमिका प्रशांत किशोर यांनी मांडली.

अमित शाहांच्या दौऱ्यावर प्रशांत किशोर यांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बिहारच्या दौऱ्यावर होते. त्यावरून प्रशांत किशोर यांनी शाहांवर टीका केली. "आतापासून निवडणूक होईपर्यंत मोदी आणि अमित शाह यांना बिहार दिसेल. यांनी सांगायला हवं की, बिहारच्या विकासासाठी त्यांनी काय केलं?", असा सवाल किशोर यांनी केला. 

"उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये फरक आहे. योगींचे संपूर्ण राजकारण हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणावर चालते. आमची इच्छा आहे की, बिहारचा उत्तर प्रदेश होऊ नये", अशी टीका प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनात यांच्यावर केली.

Web Title: "Kunal Kamra is a patriot, his intentions were not wrong"; What did Prashant Kishor say about singing about Eknath Shinde?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.