शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिले विश्वासमताला सामोरे जाण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 22:23 IST

कर्नाटकमधील राजकीय नाट्यामध्ये आज पुन्हा एकदा एक नवे वळण आले आहे.

बंगळुरू - कर्नाटकमधील राजकीय नाट्यामध्ये आज पुन्हा एकदा एक नवे वळण आले आहे. आमदारांची फुटाफूट होऊ नये म्हणून, भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसने आपापल्या आमदांरांना सुरक्षित स्थळी पोहोचवले असून, मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचे संकेत दिले आहेत.  कुमारस्वामी यांनी सांगितले की, आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती निवळण्यासाठी आम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाऊ. आम्ही कुठल्याही परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी तयार आहोत.'' कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचे संकेत दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस आणि जेडीएसप्रमाणेच भाजपानेही आपल्या आमदारांची सुरक्षित ठिकाणी रवानगी केली आहे. आता तिन्ही पक्षांचे आमदार शनिवार आणि रविवारी बंगळुरूबाहेरील रिसॉर्टमध्ये राहणार आहेत. भाजपालाही आपल्या आमदारांकडून बंडखोरी होण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे नव्याने निवडून आलेले आमदार आणि संशयास्पद हालचाली असलेल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.  दरम्यान, कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेऊ नका, असा आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. कर्नाटकातील जनता दल (एस) आणि काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष आमचे राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याच आरोप करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर येत्या मंगळवारपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असा आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या मंगळवारी होणार आहे.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)congressकाँग्रेसBJPभाजपा