शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजला कुमारस्वामींचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 13:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज पूर्ण करत कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना चॅलेंज दिले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज पूर्ण करत कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना चॅलेंज दिले आहे. मात्र, फिटनेस चॅलेंज स्वीकारण्याऐवजी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीच पंतप्रधान मोदींना वेगळंच चॅलेंज देत टोला हाणला आहे. ''माझ्या आरोग्यप्रती पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केल्याबाबत मी त्यांचे आभार मानतो. मात्र मला राज्याच्या फिटनेसबाबत अधिक चिंता आहे'', अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे. एवढंच नाही तर राज्याचं फिटनेस सुधारण्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे पाठिंब्याचीही मागणी केली आहे. 

दरम्यान, विराट कोहलीनं दिलेलं फिटनेस चॅलेंज पूर्ण करत पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी योगाभ्यास करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विट करत त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, टेनिसपटू मनिका बत्रा आणि आयपीएस अधिकाऱ्यांना फिटनेस चॅलेंज दिलं.

(पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले विराटचे फिटनेस चॅलेंज, पाहा व्हिडीओ)पंतप्रधानांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत कुमारस्वामी यांनी आभार व्यक्त केले. ''शारीरिकरित्या सुदृढ असणं महत्त्वपूर्ण आहे आणि मी या गोष्टीचे समर्थनही करतो. योग-ट्रेडमिल हे माझ्या दैनंदिन शारीरिक कसरतीमधील हिस्सादेखील आहेत. मात्र तरीही आपल्या राज्याच्या फिटनेसबाबत मला अधिक चिंता आहे आणि यासाठी मला तुमचंही समर्थन हवंय'', असे कुमारस्वामींनी ट्विटमध्ये म्हटलंय. 

 

असे सुरू झाले फिटनेस चॅलेंज22 मे रोजी राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिटनेसचं महत्त्व पटवून देण्यासाठी एका निराळ्या पद्धतीने सोशल मीडियाची मदत घेतली. राज्यवर्धन सिंह राठोड यांनी व्यायाम करत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ‘हम फिट तो इंडिया फिट’ हा फिटनेस मंत्र देत राज्यवर्धन सिंह राठोड यांनी विराट कोहली, सायना नेहवाल आणि ह्रतिक रोशनलाही या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन केलं होते. तेव्हापासून सोशल मीडियावर ‘फिटनेस चॅलेंज’ हे ट्रेंडमध्ये आहे.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीFitness Tipsफिटनेस टिप्स