शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुमार गंधर्वांच्या हरवलेल्या मुलाखती आल्या पुस्तकरूपात, एनसीपीएत रंगला ‘गंधर्वांचे देणे’चा सुरेल सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 12:12 IST

Mumbai: बंदिश, ठुमरी, राग संगीत, आलापी अशा संगीताच्या विविध प्रांतात हुकमी मुशाफिरी करत त्यात नवे प्रयोग करत स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या पंडित कुमार गंधर्व यांच्या सांगीतिक चिंतनाचा अनमोल ठेवा असलेल्या ‘गंधर्वांचे देणे’ या पुस्तकाचे एनसीपीए येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन झाले.

 मुंबई - बंदिश, ठुमरी, राग संगीत, आलापी अशा संगीताच्या विविध प्रांतात हुकमी मुशाफिरी करत त्यात नवे प्रयोग करत स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या पंडित कुमार गंधर्व यांच्या सांगीतिक चिंतनाचा अनमोल ठेवा असलेल्या ‘गंधर्वांचे देणे’ या पुस्तकाचे एनसीपीए येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन झाले. या कार्यक्रमादरम्यान पं. सत्यशील देशपांडे, कुमार गंधर्वांचे नातू भुवनेश कोमकली आणि विख्यात गायिका अश्विनी भिडे यांनी स्वरांचा साज चढवत कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

१९८५ साली ग्रंथाली प्रकाशनाशी संबंधित कुमार केतकर, अरुण साधू, संजीव खांडेकर, वासंती मुजुमदार, अरुण मुजुमदार यांनी पं. कुमार गंधर्व यांची सहा दिवस आणि १३ तास मुलाखत घेतली होती. यामध्ये संगीतातील विविध विषयांवरील कुमारांचे चिंतन यावर त्यांना बोलते केले. मधल्या काळात या मुलाखतींचा ठेवा गहाळ झाला होता. चार वर्षांपूर्वी तो पुण्यातील एका व्यक्तीला सापडला व त्याने हा ठेवा ग्रंथालीच्या सुपूर्द केला. त्यावर आधारित या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. एकाअर्थी हे पुस्तक ‘गाणारे पुस्तक’ आहे. कारण या पुस्तकामध्ये एकूण ५४ क्यूआर कोड देण्यात आले असून, वाचकांना त्यातील मुलाखती व कुमारांच्या मैफली या क्यूआर कोड स्कॅन करून थेट त्यांच्या आवाजात ऐकता येणार आहेत. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला या पुस्तकातील काही आठवणींचे अभिवाचन चंद्रकांत काळे व माधवी पुरंदरे यांनी केले. पुस्तकाचे प्रकाशन, विख्यात शास्त्रीय संगीत गायिका अश्विनी भिडे, पं. सुरेश तळवळकर, पं. सत्यशील देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, पुस्तकाचे संपादक अतुल देऊळगावकर, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, एनसीपीएचे मुख्य वित्तीय अधिकारी सिद्धार्थ देशपांडे आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. 

गौरी राग डोळे वटारून नसतो...यावेळी कुमारांची आठवण सांगताना पं. सत्यशील देशपांडे म्हणाले की, मी एकदा गौरी या धीरगंभीर मानल्या जाणाऱ्या रागाचा रियाज करत होतो. केसरबाईंना मी गौरी राग गाताना डोळे वटारून तो गाताना पाहिले होते. मला वाटले, या रागाच्या गायनाला डोळे वटारण्याच्या अभिनिवेशाची गरज आहे. मी तसाच गात असताना कुमारांनी मला पाहिले व म्हणाले, संगीताकडे लक्ष दे. डोळे वटारले म्हणजे गायन गंभीर होते असे नाही.

स्वतःला विसरण्यासाठी मी संगीत करतो...कुमार गंधर्व यांचा प्रदीर्घ सहवास लाभलेले विख्यात तबलावादक पं. सुरेश तळवळकर म्हणाले की, कुमारांसाठी संगीत हे जीवनसाध्य होते. ते म्हणायचे की, मी कोण आहे हे विसरण्यासाठी मी संगीत करतो. संगीतामध्ये प्रयोग करायचे असतात ही मोलाची शिकवण मला कुमारांनी दिली.

टॅग्स :Mumbaiमुंबई