शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पैसे उधार घेतले, तुटलेल्या हातगाडीवर विकले कुलचे; आता झाला लखपती, घेतलं 40 लाखांचं दुकान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 13:00 IST

कुलचे बनवणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मेहनतीने तब्बल 40 लाखांची कमाई करून आज दुमजली दुकान विकत घेतलं आहे.

माणसाची मेहनत कधीच वाया जात नाही असं म्हणतात. मेहनत आणि जिद्द असेल तर जगातील प्रत्येक कठीण काम करता येतं. याची अनेक उदाहरणेही आपल्यासमोर येत राहतात. पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील भवानीगडमध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे. मित्राकडून पैसे उधार घेऊन एका तुटलेल्या हातगाडीवर एका तरुणाने कुलचे विकले. त्याने केवळ कुलच विकले नाही तर त्यातून भरपूर कमाई करून आज 40 लाखांचे दुमजली दुकान खरेदी करण्यात त्याला यश आले आहे. 

पंजाबच्या 'बासू कुलचेवाला' हा सर्वच तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. बासू याच्या यशाची पंजाबमध्ये चर्चा रंगली आहे. 'बासू कुलचेवाला' या नावाने प्रसिद्ध असलेला बासू आपल्या यशाचे श्रेय कठोर परिश्रम आणि जिद्दीला देत आहेत. बासू म्हणतो की, सुरुवातीला हातगाडीला टायरपण नव्हते. त्यामुळे रस्त्यावर ही गाडी खेचून आणावी लागत होती. पण आज माझ्या यशाची गोष्ट शहरभर प्रसिद्ध होत आहे.

दुकानावर मोठ्या अक्षरात बासू कुलचे असं लिहिलं आहे. कुलचे बनवणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मेहनतीने तब्बल 40 लाखांची कमाई करून आज दुमजली दुकान विकत घेतलं आहे. बासूचे वय 28 वर्षे आहे. बासूने म्हटलं की, कुलचा बनवण्यासाठी जे काही साहित्य लागायचे ते मित्रांकडून पैसे उधार घ्यायचो. हिंमत हारलो नाही. हळूहळू मेहनतीने यश मिळवले. आज बासूने आपल्या मेहनतीने 40 लाखांचे दुकान विकत घेतले आहे, ज्याचा लूक एखाद्या आलिशान शोरूमसारखा दिसतो.

बासूच्या कुलचाची चव दूरवर प्रसिद्ध आहे. हे खाण्यासाठी लांबून लोक येतात. बासूकडे अनेक प्रकारचे कुलचे आहेत. यामध्ये चिप्स कुरकुरीत कुलचा, कुरकुरे कुलचा, लेमन कुलचा, पीनट कुलचा आणि आइस कुलचा यांचा समावेश आहे… कुलचांच्या विविधतेबद्दल बोलायचे तर, असे अनेक प्रकार आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी