कुलभूषण जाधव यांचा दूतावास संपर्क लांबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 03:17 IST2019-08-04T03:17:35+5:302019-08-04T03:17:46+5:30

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मतभेदाच्या पार्श्वभूमीवर जाधव आणि भारतीय अधिकाऱ्यांची चर्चा होऊ शकलेली नाही.

Kulbhushan Jadhav's contact with the embassy was delayed | कुलभूषण जाधव यांचा दूतावास संपर्क लांबला

कुलभूषण जाधव यांचा दूतावास संपर्क लांबला

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना दूतावास संपर्क (काउन्स्युलर अ‍ॅक्सेस) करण्याची परवानगी देण्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मतभेदाच्या पार्श्वभूमीवर जाधव आणि भारतीय अधिकाऱ्यांची चर्चा होऊ शकलेली नाही. पाकिस्तानच्या एका न्यायालयाने जाधव (४९) यांना हेरगिरी आणि विध्वंसक कारवायांच्या आरोपावरून एप्रिल २०१७ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.

Web Title: Kulbhushan Jadhav's contact with the embassy was delayed