KPCCs Satish Jarkiholi hits out at Maharashtra leaders over Shivaji maharaj statue row | "शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही; मनगुत्ती प्रकरणात महाराष्ट्रानं नाक खुपसू नये"

"शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही; मनगुत्ती प्रकरणात महाराष्ट्रानं नाक खुपसू नये"

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही. शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत. बेळगाव जिल्ह्यात स्थापन केलेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तींमध्ये महाराष्ट्राचे कोणतेही योगदान नाही. कर्नाटकातील स्थानिक विषयांमध्ये महाराष्ट्राने नाक खुपसू नये आणि याचा नैतिक अधिकारही त्यांना नाही, असे वक्तव्य कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. बेळगावमध्ये सोमवारी पत्रकारांशी ते बोलत होते.

ते म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. यमकनमर्डी क्षेत्रातील कडोलीमध्ये ५० लाख रुपये खर्चून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नव्याने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मी स्वत: त्यात १५ लाख रुपये दिले आहेत. दरम्यान ,संपूर्ण मनगुत्ती गावाला कर्नाटक पोलिसांनी वेढा दिला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: KPCCs Satish Jarkiholi hits out at Maharashtra leaders over Shivaji maharaj statue row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.